टपाल तिकिटाचा 16 कोटीत लिलाव
अनेकदा किरकोळ गोष्टी एका चुकीमुळे अत्यंत खास ठरत असतात. अलिकडेच टपाल तिकिटाला 16.48 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. छपाईत गडबड झाल्याने या टपाल तिकिटाला लिलावात प्रचंड मोठी किंमत प्राप्त झाली आहे. 1918 मधील अमेरिकेचे एक टपाल तिकिट आहे. याचा वापर जगातील पहिल्या नियमित स्वऊपातील निर्धारित एअरमेल सेवांच्या तिकिटांवर करण्यात आला होता. यावर सर्वसाधारपणे एक ‘जेनी’ कर्टिल बायप्लेनला वरच्या दिशेने रेखाटण्यात आले होते. परंतु याची छपाई करताना काही कर्मचाऱ्यांनी विमानाचे चित्र उलटे छापले आहे. म्हणजेच तयार झालेले चित्र ‘इनवर्टेड जेनीज’चे होते. 100 तथाकथित ‘इनवर्टेड जेनीज’ची एक शीट पूर्वी विकण्यात आली होती आणि काही काळानंतर यातील चूक निदर्शनास आणून दिल्यावर ती खास ठरली होती. न्यूयॉर्कमध्ये सीगल लिलाव गॅलरीचे अध्यक्ष आणि स्टॅम्प क्षेत्राचे तज्ञ स्कॉट ट्रेपेल यांच्यानुसार हे स्टॅम्प संग्रहाचे प्रतीक ठरल्याने या तिकिटाला इतकी मोठी किंमत मिळाली आहे. 1918 मध्ये विमान फारसे प्रचलित नव्हते. तर अनेक लोकांना विमान कसे दिसते हे देखील माहित नव्हते. याचमुळे स्टॅम्पवर विमानाचे उलटे चित्र असूनही लोकांच्या ते त्वरित लक्षात आले नव्हते. पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्कला जेव्हा यासंबंधी विचारणा करण्यात आली असता तो ‘मला दोष देऊ नका, विमान कसे दिसते हे मला माहित नाही, याचमुळे जेव्हा मी या तिकिटाची विक्री केली, तेव्हा त्यातील चूक मला जाणवली नाही’ असे उत्तर देल होते.