For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मार्च एंडिंगमुळे पोस्ट कार्यालयाच्या सेवा ठप्प

10:54 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मार्च एंडिंगमुळे पोस्ट कार्यालयाच्या सेवा ठप्प

आजपासून पूर्ववत होण्याची शक्यता

Advertisement

बेळगाव : जुने आर्थिक वर्ष संपून नवीन वर्ष सुरू झाल्याने पोस्ट कार्यालयाने दोन दिवस सेवा बंद ठेवल्या होत्या. सोमवारी व मंगळवारी बँकिंगसंदर्भात सर्व सेवा बंद असल्याने मुख्य पोस्ट कार्यालयासह शहरातील सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. बुधवारपासून सर्व सेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे. पोस्ट कार्यालयाने मागील काही वर्षांत बँकिंग क्षेत्रात पाय रोवले आहेत. आरडी, फिक्स्ड डिपॉझिट यांसह सुकन्या समृद्धी, पीएलआय, इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासह इतर सेवा दिल्या जातात. जुने आर्थिक वर्ष संपून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने सोमवारी व मंगळवारी सेवा बंद करण्यात आल्या होत्या. केवळ टपाल सेवा वगळता इतर सर्वच सेवा ठप्प होत्या. यामुळे एरव्ही गर्दी राहणाऱ्या कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात सोमवारी व मंगळवारी शुकशुकाट होता.

नागरिकांना बसला फटका

Advertisement

गृहलक्ष्मीसह केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी पोस्ट कार्यालयात खाती उघडण्यात आली आहेत. खात्यातील रक्कम काढण्यासाठी दररोज मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आयबीपीएस काऊंटरवर महिलांची गर्दी असते. परंतु बँकिंग सेवा बंद असल्यामुळे  महिलांना माघारी फिरावे लागले.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.