महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बस तिकीट दरवाढीची शक्यता

06:34 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डिझेलवरील करवाढीचा परिणाम : परिवहन अधिकाऱ्यांचे संकेत

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचे दर प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढले आहे. याचा परिणाम सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेवरही होण्याची चिन्हे आहेत. कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) बस तिकीट दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 ऊपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीला जोरदार विरोध व्यक्त होत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बहुतांश बस डिझेलवर धावत असल्याने प्रवासी तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बसेसच्या  खर्चावरही परिणाम होतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

केएसआरटीसी दररोज 6.2 लाख लिटर डिझेल जमा करते तसेच इंधन दरवाढीनंतर केएसआरटीसीला इंधनावर दररोज 18.2 लाख ऊपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहे. केएसआरटीसी डिझेल खरेदीसाठी दरमहा सरासरी 5.4 कोटी ऊपये आणि वर्षाला 65 कोटी ऊपये खर्च करते. आता डिझेल दरवाढीमुळे अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे, असे परिवहनच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दुसरीकडे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, इंधन खर्च, देखभाल खर्च आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या वाढत्या खर्चामुळे केएसआरटीसीने राज्य सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील चार परिवहन निगमकडून बस तिकीट दरात 20 ते 25 टक्के वाढ करण्याची मागणी करत असताना, राज्य सरकार 10 ते 15 टक्के दरवाढीला संमती देण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचे आज राज्यव्यापी आंदोलन

राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर जनतेला निष्ठेने दरवाढ, करवाढीची देणगी देत आहे, अशी खोचक टिप्पणी माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भाजप तीव्र निषेध नोंदवत असून सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  बेंगळूरमधील भाजपचे कार्यालय जयन्नाथ भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी राज्य भाजप आंदोलन करणार आहे. बेंगळूरमधील फ्रीडम पार्क, जिल्हा केंद्रे, तालुका केंद्रांमध्ये आंदोलन केले जाईल. दरवाढ पूर्णपणे मागे घ्यावी, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article