For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसकडून खोट्याला सत्य बनविण्याचा प्रयत्न : बोम्माई

11:32 AM Dec 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसकडून खोट्याला सत्य बनविण्याचा प्रयत्न   बोम्माई
Advertisement

बेंगळूर : मतचोरीच्या नावाखाली काँग्रेस खोट्याला सत्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि खासदार बसवराज बोम्माई यांनी लगावला. हावेरी येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मतचोरीच्या खोट्याला सत्य बनवण्याच्या मोहिमेवर अनेक काँग्रेस नेते विश्वास ठेवत नाहीत. ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी तिथे जात आहेत. हजारवेळा खोटे बोलणाऱ्या आणि सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर काँग्रेसचा विश्वास आहे. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी हे लक्षात घेऊन बिहारमध्ये निवडणुकीला सामोरे गेले. तिथे काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या. त्यांनी अद्याप त्यातून धडा घेतलेला नाही. म्हणजेच ते काहीही करू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.