For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणच्या आण्विक केंद्रावर इस्रायलकडून हल्ल्याची शक्यता

06:58 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
इराणच्या आण्विक केंद्रावर इस्रायलकडून हल्ल्याची शक्यता
Advertisement

इराणकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, आम्ही देखील हेच करणार : संरक्षणमंत्री

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

इराणने 13 एप्रिल रोजी रात्री उशिरा 300 क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्ससोबत इस्रायलवर हल्ला करत सीरियातील स्वत:च्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा सूड उगविला होता. यानंतर आता इस्रायलकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. इस्रायलमध्ये वॉर कॅबिनेटकडून बैठकांचे सत्र सुरू असून लवकरच कठोर पाऊल उचलले जाऊ शकते. इस्रायलकडून इराणच्या आण्विक केंद्रावर हल्ला केला जाणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

इराणवर प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईदरम्यान इस्रायल त्याच्या आण्विक केंद्रांना लक्ष्य करू शकतो अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाचा न्युक्लियर वॉचडॉग आयएईएने व्यक्त केली आहे. आयएईएने मंगळवारीच इराणच्या आण्विक केंद्रांची पाहणी सुरू केली आहे. यापूर्वी इराणने रविवारी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही केंद्रं बंद केली होती.

इस्रायल प्रत्युत्तरादाख कारवाई अवश्य करणार असा निर्णय वॉर कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु हल्ला कधी आणि कुठल्या स्वरुपात करणार हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही. इस्रायलच्या वॉर कॅबिनेटमध्ये इराणच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या सैन्याच्या योजनेवर चर्चा झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदी अरेबिया आणि जॉर्डनने इस्रायलने इराणवर प्रत्युत्तरादाखल हल्ला करू नये, अन्यथा मध्यपूर्वेत युद्धाचा आगडोंब उसळेल असे आवाहन केले आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर बंदी

इस्रायलचे विदेशमंत्री काट्ज यांनी 32 देशांना पत्र लिहून इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याचबरोबर इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना घोषित करण्याचे आवाहन देखील केले आहे. इराणला रोखणे जाणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा वेळ हातातून निघून जाईल असे काट्ज यांनी म्हटले आहे.

आखाती देशांना नुकसान होणार नाही

इराणच्या विरोधातील प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईमुळे आखाती देशांना कुठलेच नुकसान होणार नाही असे आश्वासन इस्रायलने दिले आहे. इराणवर अशाप्रकारे हल्ला करू की त्याची प्रत्युत्तर देण्याची क्षमताच शिल्लक राहणार नाही असे इस्रायलने  जॉर्डन, इजिप्त आणि अन्य आखाती देशांना सांगितले आहे.

अमेरिकेच्या एनएसएचा दौरा टळला

अमेरिकेचे एनएसए जेक सुलिवन यांनी भारत दौरा टाळला आहे. इराण-इस्रायल यांच्यातील तणाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. सुलिवन चालू आठवड्यात भारतात दाखल होणार होते. त्यांच्या या दौऱ्यात इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा (आयसीईटी) आढावा घेतला जाणार होता. मागील वर्षी भारताचे एनएसए अजित डोवाल यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान आयसीईटीची स्थापना झाली होती.

तणाव नियंत्रित करण्यास इराण सक्षम

इराण पूर्ण वादाला योग्यप्रकारे हाताळू शकतो. इराण स्वत:ची प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण देखील करत राहिल अशी अपेक्षा असल्याचे चीनने म्हटले आहे. इराणच्या दूतावासावरील इस्रायलच्या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. इराणने इस्रायलवर केलेला हल्ला हा स्वत:च्या सुरक्षेसाठी केला होता असा दावा चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.