महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पोर्तुगालची झेक प्रजासत्ताकवर 2-1 ने मात

06:28 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लीपझिग (जर्मनी)

Advertisement

बदली खेळाडू फ्रान्सिस्को कॉन्सेसांवने पोर्तुगालच्या युरोपियन स्पर्धेतील सुऊवातीच्या सामन्यात चेक प्रजासत्ताकवर 2-1 असा विजय मिळवून देताना स्टॉपेज टाइममध्ये गोलाची नोंद केली. 90 व्या मिनिटाला प्रवेश केलेल्या कॉन्सेसांवने 92 व्या मिनिटाला हा गोल केला. रॉबिन ह्रानाकने सहकारी बदली खेळाडू पेद्रो नेटोचा फटका अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चेंडू मिळालेल्या या पोर्तोच्या विंगरने ही संधी वाया घालविली नाही.

Advertisement

पोर्तुगालचे प्रशिक्षक रॉबेर्टो मार्टिनेझ नंतर म्हणाले, बदली म्हणून बाहेर आलेल्या खेळाडूंनी दाखवून दिले आहे की, संघाकडे बरेच पर्याय आहेत. वरील गोलमुळे कॉन्सेसांवचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याभरात जर्सी काढल्याबद्दल त्याच्यावर कारवाईही झाली. कॉन्सेसांवचे वडील सर्जियो कॉन्सेसांव यांनी जर्मनीला युरो, 2000 च्या बाहेर फेकताना हॅट्ट्रिकची नोंद केली होती. त्या घटनेला जवळपास 24 वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यापूर्वी चेक प्रजासत्ताकचा गोलरक्षक जिंड्रिच स्टॅनेचने क्रिस्टियानो रोनाल्डोला बऱ्यापैकी रोखून दाखविले होते. पोर्तुगालचा सदर स्टार फुटबॉलपटू सहा युरोपियन स्पर्धांमध्ये खेळणारा पहिला खेळाडू बनला आहे. मात्र 39 वर्षीय रोनाल्डोला त्याच्या स्पर्धेतील विक्रमी 26 व्या सामन्यात त्याच्या विक्रमी 14 गोलांमध्ये भर घालता आली नाही. पोर्तुगालचा 41 वर्षीय बचावपटू पेपे हा या स्पर्धेत खेळणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरला आहे. 2016 च्या या विजेत्यांनी जरी चेंडूवर ताबा आणि संधी याबबतीत वर्चस्व गाजवलेले असले, तरी त्यांना फारसा पराक्रम गाजविता आला नाही. 62 व्या मिनिटाला लुकास प्रोव्होदने गोल करून चेक प्रजासत्ताकला आघाडी मिळवून दिल्यानंतर पोर्तुगालने 70 व्या मिनिटाला बरोबरी साधली. यावेळी नुनो मेंडिसचा हेडर स्टॅनेचने निष्फळ ठरविल्यानंतर ह्रानाकला आदळून चेंडू गोलमध्ये गेला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article