महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताकडे ओमानमधील बंदराची धुरा

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत साधणार शक्तिसंतुलन : सागरी व्यापार होणार सुलभ

Advertisement

वृत्तसंस्था /भुवनेश्वर

Advertisement

भारताला ओमानमध्ये एका रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण बंदरापर्यंत थेट अॅक्सेस मिळाला आहे. यामुळे फारसच्या आखातातून होणाऱ्या व्यापारी वाहतुकीप्रकरणी भारताला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ओमानचे सुल्तान हॅथम बिन तारिक यांच्या नवी दिल्ली दौऱ्याच्या दोन महिन्यांच्या आता भारताला डुक्म बंदराची धुरा मिळाली आहे. डुक्म बंदर हे रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या बंदरामुळे पश्चिम आणि दक्षिण हिंदी महासागर क्षेत्रात भारताची भूमिका वाढविण्यास मदत होणार आहे. लाल समुद्र आणि पश्चिम हिंदी महासागर क्षेत्रात सुरू असलेल्या संकटादरम्यान भारतीय नौदलाची भूमिका वाढविणारे हे पाऊल ठरणार आहे. डुक्म बंदर मुंबईपासून पश्चिम दिशेला समांतर स्थानी आहे. अशा स्थितीत भारत  डुक्म बंदराद्वारे स्वत:ची मालवाहतूक सहजपणे भूमार्गाने सौदी अरेबिया तसेच त्यापुढील क्षेत्रापर्यंत करू शकतो. तसेच यामुळे एडनचे आखात आणि लाल समुद्राला लागून असलेल्या भागांमधील हुती बंडखोरांच्या हल्ल्यांनाही रोखता येईल. या क्षेत्रात झालेल्या हल्ल्यांमुळे सागरी व्यापारावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. अशा स्थितीत भारत-सौदी अरेबियाच्या रस्तेमार्गाद्वारे स्वत:चा व्यापार जारी ठेवता येणार आहे. ओमानचे डुक्म बंदर सागरी सहकार्याच्या क्षेत्रात भारतासाठी एक लॉजिस्टिक तळ ठरणार आहे. मानवी सहाय्य आणि आपत्तीतील बचावकार्याकरता भारताची भूमिका वाढणार आहे. हे बंदर भारतीय आणि आफ्रिकन बाजारपेठांपर्यंत पुरवठा करणाऱ्या शिपिंग लाइन्ससाठी सहजपणे उपलब्ध आहे. बंदरापर्यंत पोहोच मिळाल्याने भारताला संघर्षयुक्त क्षेत्रांना टाळण्यासाठी नवा मार्ग मिळाला आहे.

जहाजांच्या दुरुस्तीची मिळणार सुविधा

डुक्मच्या स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये इंटीग्रेटेड जहाज दुरुस्ती यार्ड आणि ड्राय डॉक सुविधा देखील उपलब्ध आहे. अशा स्थितीत जहाजांची दुरुस्ती करण्याचे काम सहजपणे करता येईल. हे बंदर ओमानची राजधानी मस्कतपासून 550 किलोमीटर अंतरावर आहे. डुक्म येथून रस्तेमार्गाद्वारे सहजपणे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये पोहोचता येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article