पोर्शे कार अपघात प्रकरण : वेदांत आगरवालचे रक्ताचे नमुने फेकले कचऱ्यात! ससूनमधील २ डॉक्टरांना अटक
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आता पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना ताब्यात घेतले असून या दोन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचं समोर आलं आहे. ससून हॉस्पीटल फॉरेन्सिक विभागाचे प्रमुखासह एका सहायक डॉक्टराचा समावेश आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर असे नाव असणाऱ्या या डॉक्टरांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीच्या रक्ताचे नमुन्यांना त्याच वेळी कचऱ्याची डब्यात टाकल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील माहीती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली आहे.
संपुर्ण देशभरात खळबळ माजवून देणारा कल्याणीनगर पोर्शे कार अपघातामध्ये आता एक नविन ट्विस्ट समोर आला आहे. अपघातानंतर आरोपी वेदांत आगरवाल याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात येऊन त्याजागी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या रात्री तो पुण्यातील पबमध्ये जाऊन दारू प्यायला असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आले आहे. त्यामुळे त्याच्या रक्तामध्येही दारूचा अंश सापडण्याची शक्यता निर्माण झाल्याने डॉक्टरांना हाताला धरून संगनमताने हे नमुने बदलण्यात आले आहेत.
अपघाताच्या दिवशी, सकाळी 11 वाजता वेदांत आगरवाल यांना वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या अहवालात पहिल्या नमुन्यात अल्कोहोल नसल्याचे दिसून आल्याने संशय निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात दुसरी रक्ताची चाचणी करण्यात आली. यामध्ये डीएनए चाचण्यांचे नमुने दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे..असल्याची स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपी वेदांत आगरवाल याचे संरक्षण करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी पुराव्यांशी छेडछाड केली असल्याचा संशय तपासकर्त्यांना आला.
यासंदर्भाततील माहीती देताना पुण्याचे पोलीस आयुक्तांनी माहीती दिली. "आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने घेतलेल्या डॉ. श्रीहरी हलनोरला काल रात्री अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याने फॉरेन्सिक मेडिसिनचे एच.ओ.डी. डॉ. अजय तावरे यांच्या निर्देशानुसार रक्ताचे नमुने बदलले होते," असा खुलासा केला.
पोलिस आयुक्तांच्या या खुलाशानंतर ससून हॉस्पीटलचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.यापुर्हीही ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या या रूग्णालयामधील मोठ्या डॉक्टरांच्या कारनाम्यावर टिका होत असताना पुणे कार अपघात प्रकरणानंतर ते आता थेट टिका होऊ लागली आहे.