For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसंख्या-2022 - काही निरीक्षणे

06:30 AM Aug 05, 2022 IST | Tarun Bharat Portal
लोकसंख्या 2022   काही निरीक्षणे
Advertisement

सोमवार, दि.11.07.2022 रोजी ‘युनायटेड नेशन्स’ वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस् ह्या वार्षिक अहवालाची 27 वी आवृत्ती प्रसिध्द करण्यात आली. 2022 मध्ये 142.6 कोटी लोकसंख्येने चीन सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र आहे. भारताची लोकसंख्या 141.2 कोटी झाली आहे. 2023 मध्ये मात्र भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त असेल.

Advertisement

जगाची लोकसंख्या पुढीलप्रमाणे बदलत गेली आहे.

  • 1804............... 100 कोटी
  • 1920............... 200 कोटी
  • 1959............... 300 कोटी
  • 1974............... 400 कोटी
  • 1987............... 500 कोटी
  • 1998............... 600 कोटी
  • 2011............... 700 कोटी
  • 2022............... 800 कोटी

लोकसंख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालखंड सतत कमी होत गेला आहे.

Advertisement

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, 2020 मध्ये जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर वार्षिक 1 टक्केच्या आत आला. लोकसंख्या वृध्दीचा हा दर पुढील काही दशके व शतकांखेर घटतच राहणार आहे.

पुढचे अंदाज- संयुक्त राष्ट्र संघाच्या उपरोक्त अहवालाप्रमाणे 2050 मध्ये भारताची लोकसंख्या 166.8 कोटी हाईल व तेंव्हा चीनची घटणारी लोकसंख्या 131.7 कोटी एवढीच असेल.

2050 मध्ये जगाची लोकसंख्या 900.7 कोटी असेल.

लोकसंख्येचे अधिक प्रमाण असणारे जगाचे दोन भाग म्हणजे पूर्व व दक्षिण-पूर्व अशिया-200.3 कोटी (29 टक्के जगाच्या).

मध्य व दक्षिण आशिया- 200.1 कोटी (26 टक्के जगाच्या) अर्थात या भारत व चीनच्या लोकसंख्या याच भागात येतात. 2017 मध्ये मध्य व दक्षिण आशिया जगात सर्वाधिक लोकसंख्येचा भाग होता.

2100 साली जगाची लोकसंख्या 1000.4 कोटी असेल.

भारताचा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे- 5 भारताचा एकूण जनन क्षमता दर (Total fertility rate) 2021 मध्ये प्रथमच 4 थ्या अहवालात 2.2 होता तो 2.0 म्हणजेच पुनर्भरण दरापेक्षा (2.1) पेक्षा कमी झाला. साहजिकच लोकसंख्या निव्वळ आकुंचन प्रक्रिया सुरू झाली.

संतती प्रतिबंधक पध्दतींचा वाढता वापर, दोन बाळंतपणातील वाढते अंतर, वाढत्या आरोग्य-सुविधांची उपलब्धता, कुटुंब नियोजनास वाढते प्रोत्साहन. यामुळे हे घडलेले दिसते. वाढते उत्पन्न/ संपत्ती व वाढते शिक्षण हेही महत्त्वाचे कारक घटक आहेत. एक स्त्राr जननक्षम वयात, किती मुलांना जन्म देते. ती संख्या म्हणजे जनन क्षमता दर.

अर्थात हेही लक्षात घेतले पाहिजे की, याच काळात मरण - संभाव्यता दर देखील घटत आहे. वयाच्या 5 वर्षाच्या आत मरण येणाऱयांची संख्या (दर) म्हणजे मरण संभाव्यता दर. हे प्रमाण वाढत्या आरोग्य सेवा व औषध क्षेत्रातल्या सुधारणामुळे कमी होते. 65 वर्षावरील वृध्दांची संख्या 5 वर्षाच्या मुलांच्या संख्येपेक्षा 2018 मध्ये अधिक दिसून आली. अलीकडच्या काळात लोकसंख्या वाढण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. अकाली मरणाऱयांचे प्रमाण कमी होणे हे लोकसंख्या वाढीचे कारण होवू शकते.

आयुर्मर्यादा - 2019 मध्ये जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मर्यादा 72.8 अशी जागतिक अवस्था होती. 1990 मध्ये हे प्रमाण 9 वर्षे कमी होते. मरण संभाव्यता दर कमी होत जाण्याचे सरासरी आयुर्मर्यादा आणखी वाढत 2050 मध्ये ती 77.2 होण्याची शक्यता आहे. मधल्या कोविड-19 महामारीच्या काळात आयुर्मर्यादा कांहीशी घटली होती.

विशेष म्हणजे 2021 मध्ये स्त्रियांची सरासरी आयुर्मर्यादा 73.8 वर्षे- ही पुरूषांच्या 68.4 वर्षापेक्षा अधिक दिसून आली. हा प्रकार बहुतेक सर्वच प्रदेशात दिसतो. स्त्रियांचे सरासरी आयुर्मर्यादेच्या बाबतीत अलीकडच्या काळात स्त्राr-पुरूष अंतर वाढताना दिसत आहे. मधल्या काळात हे अंतर कमी होत होते. सरासरी आयुर्मान ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंडमध्ये कमाल (84.2 वर्षे) होते व सब-सहारा आफ्रिकेत सर्वात कमी (59.7 वर्षे) असे होते. मध्य व दक्षिण आशिया - 67.7 वर्षे

  • उत्तर आफ्रिका - 72.1 वर्षे
  • लॅटिन अमेरिका - 72.2 वर्षे
  • युरोप व उत्तर अमेरिका - 77.2 वर्षे

असे सरासरी आयुर्मान दिसते.

ऑस्ट्रेलिया, हॉगकाँग, मॅकाओ व जपानमध्ये सरासरी आयुर्मान अधिक तर मध्य आफ्रिका, छाड, लेसोथो व नायजेरिया प्रदेशात सरासरी आयुर्मान कमी आढळते. उपरोक्त अहवालाप्रमाणे सरासरी आयुर्मानातील प्रादेशिक फरक वाढण्याची शक्यता आहे. कमाल सरासरी आयुर्मान व किमान सरासरी आयुर्मान असणाऱया देशातील फरक मुख्यतः 5 वर्षाखालील बालक मृत्यूच्या प्रमाणातील अतिरिक्तता हे दिसते.  अन्न टंचाईचे माल्थसचे भूत मेले असेल. पण कुपोषण व परिणामी बालक मृत्यू ही सामाजिक समस्या महत्त्वाची ठरणार असे दिसते. प्रा.डॉ. जे.एफ. पाटील

Advertisement
Tags :

.