सायन्स पार्कची दुरवस्था
04:29 AM Nov 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
योग्य व्यवस्थापनाअभावी उपकरणे मोडकळीस
Advertisement
प्रतिनिधी/ बेळगाव
सुवर्णविधानसौधजवळ उभारण्यात आलेल्या सायन्स पार्कची सध्या दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पाहणीसाठी अनेक पर्यटक येतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाण्याअभावी येथील रोपे सुकून गेली असून
Advertisement
लॉन कोरडे पडले आहे. येथे उभारण्यात आलेली उपकरणे योग्य व्यवस्थापनाअभावी मोडून पडली आहेत. येथे नियमित वीजपुरवठा होत नाही. शिवाय स्वच्छतागृहही नसल्याने गैरसोय होत आहे.
स्थानिक महिलांना रोजगार हमी योजनेंतर्गत देखभालीची जबाबदारी दिली आहे. परंतु पाण्याअभावी त्यांच्या हाती काही नाही. येत्या 8 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होत आहे. हजारो विद्यार्थी पार्कला भेट देण्यासाठी येतात. परंतु येथे मूलभूत सुविधा नसल्याने त्यांचा हिरमोड होणार हे लक्षात घेऊन या पार्कची त्वरित सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
Advertisement
