For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्मार्ट सिटीच्या बसथांब्यांची दयनीय अवस्था

11:24 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्मार्ट सिटीच्या बसथांब्यांची दयनीय अवस्था
Advertisement

शहरातील बऱ्याच बसस्थानकात कचरा साचून : मोकाट जनावरांचे बनले आश्रयस्थान, तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर कधी तरी स्मार्ट होणार आहे का? हा प्रश्नच आहे. स्मार्ट सिटीमध्ये बेळगाव शहराची निवड होऊन निधीही उपलब्ध झाला. तरीसुद्धा अद्याप हे शहर स्मार्ट झाले आहे, असे म्हणता येत नाही. हा प्रशासनाचा किंवा स्मार्ट सिटी विभागाचा दोष असला तरी नागरिकही स्मार्टपणा दाखवत नाहीत. स्मार्ट सिटीअंतर्गत केलेल्या कामांबद्दल नागरिक कमालीची अनास्था दाखवत आहेत. स्मार्ट सिटीच्या बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. तात्पुरती दुरुस्ती केली जाते. परंतु पुन्हा जैसे थे अशीच थांब्यांची अवस्था होते. सध्या कॉलेज रोड, बेळगाव, वडगाव-येळ्ळूर क्रॉस, अनगोळ नाका, भवानीनगर, जक्कीनहोंडा व उद्यमबाग येथील बसथांबे हे प्रवाशांच्या सोयीचे नसून मोकाट जनावरांचे आश्रयस्थान झाले आहेत. केवळ बसथांब्यांवरच आता स्मार्ट सिटीअंतर्गत सातत्याने किती खर्च होणार आहे? हा विचार करण्याजोगा विषय आहे. हल्ली बसेसना वाढती गर्दी आहे. गॅरंटी योजनेंतर्गत महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र वाढत्या उन्हात आणि त्यानंतर पावसातही त्यांना बसच्या प्रतीक्षेत उभे रहावे लागत आहे. काही बसथांब्यांमध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. परंतु आजूबाजूला कचरा साचला आहे. काही ठिकाणी बसण्याची सोय नाही. जेथे खुर्च्या आहेत त्या मोडकळीस आल्या आहेत. काही ठिकाणी जनावरांनी आश्रय घेतला आहे. तर बहुतेक बसथांबे हे जाहिरातीचे हक्काचे स्थान झाले आहेत. अशा सर्व समस्यांमुळे प्रवाशांच्या सोयीकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही. धर्मवीर संभाजी चौक येथे असणाऱ्या बसथांब्यांमध्ये कचरा साचला आहे. बाजूला स्मार्ट सिटीअंतर्गत तयार केलेले फिरते शौचालय धूळखात पडून आहे. एकूणच कोणतेच बसथांबे स्मार्ट नसून तेथे जाण्यापेक्षा रस्त्यावर उभारलेले बरे, अशीच मानसिकता प्रवाशांची झाली आहे.

This year, the Municipal Corporation has charged twice the house rentअधिकाऱ्यांनी एकदा तरी पाहणी करावी

Advertisement

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी किमान एकदा तरी या सर्व बसथांब्यांची पाहणी करावी. म्हणजे त्यांना प्रवासी दररोज कसा प्रवास करत असतील आणि कसे उभे राहत असतील, याची कल्पना येईल. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या गैरसोयीची कल्पना येणार नाही. त्यामुळे त्यांनी एकदा तरी हा प्रयोग करून पहावा.

Advertisement
Tags :

.