कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूनम गुप्ता रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर

06:48 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

पूनम गुप्ता यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. त्या आता बँकेच्या पतधोरण समितीमध्ये सक्रियपणे कार्य करणार आहेत. पूनम गुप्ता यांची डेप्युटी गव्हर्नरपदची निवड 2 एप्रिल रोजी घोषित करण्यात आली होती. अलीकडेच त्यांनी आपला कार्यभार सांभाळण्यास सुरूवात केली आहे.

Advertisement

माजी अर्थतज्ञ त्याचबरोबर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले होते. 6 सदस्यांच्या पतधोरण समितीमध्ये पूनम गुप्ता या आता राजेश्वर राव यांची जागा घेणार आहेत. पतधोरण समितीची एप्रिल महिन्यामध्ये वर्षातील दुसरी बैठक पार पडली होती. त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पावटक्का रेपोदरामध्ये कपात करण्यात आली होती. पुढील पतधोरण समितीची बैठक जूनमध्ये पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाणार असून सदरच्या बैठकीत पूनम गुप्ता यांचा सहभाग असणार आहे. सदरच्या बैठकीत पुन्हा रेपो दरात कपात होणार असा अंदाज बांधला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article