कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाबू जगजीवनराम फलकाचे कॅम्प येथे आज पूजन

12:36 PM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य समगार (चांभार) हरळय्या संघ, नागरभावी, बेंगळूर व बेळगाव जिल्हा चर्मकार (समगार) संघाच्यावतीने  कॅन्टोन्मेंटमध्ये नामफलकाचे पूजन मंगळवार दि. 18 रोजी केले जाणार आहे. सकाळी 11 वाजता कॅम्प येथे बाबू जगजीवनराम रस्ता नामफलकाचे पूजन केले जाणार आहे. भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री, कृषिमंत्री यासह अनेक पदांवर कार्यरत राहिलेल्या स्व. बाबू जगजीवनराम यांचे नाव कॅम्प येथील एका रस्त्याला देण्यात आले होते. या निमित्ताने या ठिकाणी फलक लावण्यात आला आहे. या फलकाच्या पूजनावेळी जिल्हाध्यक्ष गणेश काळे, शहराध्यक्ष रवी शिंदे, कॅन्टोन्मेंट बोर्डचे सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article