For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूजा शर्मा घर, सेलडीड देणार

12:13 PM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पूजा शर्मा घर  सेलडीड देणार
Advertisement

प्रिन्सा आगरवाडेकर यांची माहिती

Advertisement

म्हापसा : आमच्या घरावर जेसीबी घालून आमच्या घराची मोडतोड केली याबाबत पूजा शर्माला काहीच माहिती नव्हती. जेव्हा तिला माहिती मिळाली तेव्हा तिने आपल्यास तुमचे घर नको आहे. तुमच्या घराच्या सेल डीडची कागदे आपण परत करतो. एवढेच नव्हे, तर आम्हाला घर बांधून देते असे सांगितले आहे. म्हणून आपण तिच्याविऊद्धची तक्रार मागे घेत असल्याची माहिती प्रिन्सा आगरवाडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आगरवाडेकर यांनी पुढे सांगितले की, आसगावात आपण पायही ठेवणार नाही. तुझ्याप्रमाणे आपल्यासही लहान मुले आहेत बिल्डर्स व भाटकाराने मधोमध चाल रचून पूजा शर्माला गोव्यात जागा देण्याविषयी कळविले होते. आमच्या घरात बाऊंसर आणून जेसीबीच्या सहाय्याने घर पाडल्याचे कळले तेव्हा तिने आपल्याशी संपर्क साधला.

आगरवाडेकर कुटुंबीय घर मोडतोड प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून बिल्डर्स लॉबी आणि अमलीपदार्थाचा विळखा या गोष्टी समोर येऊ लागल्या असून बिल्डर्स लॉबीने हे प्रकरण मागे घेण्यासाठी 6 कोटी ऊपयांची ऑफर दिल्याचे वृत्त आहे. आगरवाडेकर कुटुंबीयांची जमीन आणि घर मिळून अंदाजे 3 कोटीची ही मालमत्ता आहे. सध्या आसगावात जमिनीचा दर 1 लाख ऊपये प्रति चौ. मीटर आहे. दिल्लीवाले अशा जमिनी सहज खरेदी करतात. हा एकूण आढावा घेऊन हे प्रकरण मिटविण्यासाठी 6 कोटीची ऑफर दिली असल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी प्रिन्सा आगरवाडेकर यांना छेडले असता पत्रकारांना ज्यांनी कुणी ही माहिती दिली, त्यांना आपल्यासमोर आणा असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. प्रदीप आगरवाडेकर वयोवृद्ध असल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांना काहीच बोलण्यास देत नाही, असे आढळून आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.