For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहन मेहराला डेट करतेय पूजा

06:38 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहन मेहराला डेट करतेय पूजा
Advertisement

विनोद मेहरा यांचा पुत्र

Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे स्वत:च्या खासगी आयुष्यासंबंधी अत्यंत लो प्रोफाइल राहते. परंतु यावेळी ती बॉयफ्रेंड रोहन मेहरासोबत दिसून आली आहे. दोघांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. रोहन हा दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांचा पुत्र आहे.

पूजा हेगडे मागील काही काळापासून रोहनला डेट करत आहे. रोहनने 2018 मध्ये सैफ अली खानच्या ‘बाजार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रोहन यापूर्वी अभिनेत्री तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मे 2019 मध्ये त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्याचे समोर आले होते.

Advertisement

पूजा यापूर्वी सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसून आली होती. फरहाद सामजी यांच्या या चित्रपटात वेंकटेश दग्गुबाती, जगपति बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंह, अभिमन्यू सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार होते.

Advertisement
Tags :

.