कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोंक्षे, तुम्ही गैर बोललात!

11:30 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री गोविंद गावडे यांची शरद पोंक्षेंवर शेरेबाजी

Advertisement

पणजी : ‘पोंक्षे, तुम्ही गैर बोललात’, अशा शब्दात जोरदार शेरेबाजी करत कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे आरोप फेटाळून लावले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी, ‘आपल्याविरोधात रचण्यात आलेले हे षडयंत्र असून  पोंक्षे यांच्या मुखातून कुणीतरी इप्सित साध्य करून घेतले आहे’, असा दावाही केला आहे. गुऊवारी कला अकादमीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दि. 13 एप्रिल रोजी कला अकादमीत ‘पुऊष’ या नाटकाचा प्रयोग होता. त्या दरम्यान केवळ दोन मिनिटांसाठी तेथील वीज व्यवस्थेत व्यत्यय आला. त्यामुळे 10 मिनिटांसाठी खेळ थांबवावा लागला.

Advertisement

ही एक तांत्रिक अडचण होती, कुणी जाणीवपूर्वक केलेले कृत्य नव्हते. त्यामुळे त्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण नव्हते. तरीही कुणीतरी तेवढ्याशा मुद्याचा गैरफायदा उठवताना त्याचा रोष मंत्री या नात्याने आपल्यावर लावला व बदनामीची सुपारी दिली, असा आरोप गावडे यांनी केला. खरे तर पुऊष च्या प्रयोगावेळी अकादमीचे तंत्रज्ञ व व्यवस्थापकही उपस्थित होते. मात्र ते रंगमंचाजवळ उपस्थित नव्हते. कारण अशी काही तांत्रिक अडचण निर्माण होईल याचे कुणाला स्वप्न पडत नसते. त्यामुळे जेव्हा रंगमंचावरील वीज पुरवठ्यात खंड पडला तेव्हा पोंक्षे यांनी या तंत्रज्ञांचा शोध घेतला, तेव्हा ते अन्यत्र उपस्थित होते.

सदर प्रकार लक्षात येताच एका तंत्रज्ञाने त्वरित रंगमंचावर धाव घेतली व केवळ 10 मिनिटांच्या आत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असेही गावडे म्हणाले. एकूण अशी परिस्थिती असतानाही पोंक्षे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना या विषयाचा मोठा बाऊ केला. मंत्री या नात्याने आपल्यासह अकादमीच्या संपूर्ण व्यवस्थापनावरही दोषारोप लगावले. हे षडयंत्र नव्हे तर काय? असा सवाल मंत्री गावडे यांनी उपस्थित केला. पोंक्षे हे कुणातरी चुकीच्या व्यक्तीच्या नादी लागले आहेत.

त्यातून ते अविचारीपणाने आरोप करत आहेत, आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी मुद्दामहून केलेले हे कारस्थान आहे, असे गावडे यांनी सांगितले. मंत्री गावडे यांनी, ‘पोंक्षे साहेब तुम्ही गैर बोललात, गैर बोललात त्याहीपेक्षा तुम्ही गैर लोकांच्या नादी लागून फसला आहात’, अशा शब्दात भावनांना वाट मोकळी करून दिली. दि. 13 रोजी सदर प्रकार घडल्यानंतर कला अकादमीच्या सदस्य सचिवांना सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले होते. तो अहवाल उपलब्ध झाला असून त्याच्याच आधारे आपण आज बोलत असल्याचे मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले. संबंधित उजेड व्यवस्थेचा दर्जा वाढविण्याचे काम हाती घेण्याची तयारी असून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची खबरदारी म्हणून योग्य उपाययोजना घेण्यात येतील असे आश्वासन मंत्री गावडे यांनी दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article