महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाचव्या टप्प्यात आज 49 जागांसाठी मतदान

06:58 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजनाथ सिंह, स्मृती इराणी यांच्यासह 9 केंद्रीय मंत्री रिंगणात; रायबरेलीत राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2024 लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवार 20 मे रोजी 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदान होत आहे. या मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून रविवारी सायंकाळी निवडणूक अधिकारी-कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर ईव्हीएम व इतर साहित्यासह रवाना झाले आहेत. आता सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना आपला अधिकार बजावता येणार आहे.

या टप्प्यात राजनाथ सिंह, स्मृती इराणी आणि पियुष गोयल यांच्यासह 9 केंद्रीय मंत्री रिंगणात आहेत. वायनाडचे खासदार राहुल गांधीही रायबरेलीमधून निवडणूक लढवत असून ही लढत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्यादृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे. पाचव्या टप्प्यामध्ये बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, महाराष्ट्रातील 13, ओडिशातील पाच, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7 जागांसह जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येकी एका जागेवर सोमवारी मतदान होणार आहे. लोकसभेच्या 543 जागांपैकी चौथ्या टप्प्यापर्यंत 380 जागांवर मतदान झाले आहे. 20 मे पर्यंत एकूण 429 जागांवर मतदान पूर्ण होईल. उर्वरित दोन टप्प्यात 114 जागांवर मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 695 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 613 पुऊष आणि 82 महिला उमेदवार आहेत. एकूण उमेदवारांमध्ये महिलांना केवळ 12 टक्के स्थान मिळाले आहे. या टप्प्यातही दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले असून त्यात काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे. काश्मीरमधील एका मतदारसंघासह संपूर्ण लडाखमध्येही सोमवारीच मतदान होणार असल्याने तेथे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या (एडीआर) मते, या टप्प्यातील 695 उमेदवारांपैकी 159 उमेदवारांवर गुन्हे दाखल असून 227 उमेदवार करोडपती आहेत. त्यांच्याकडे एक कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची संपत्ती आहे. केवळ एका उमेदवाराने आपली संपत्ती शून्य असल्याचे जाहीर केले आहे. या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार उत्तर प्रदेशातील झाशी मतदारसंघातील भाजप उमेदवार अनुराग शर्मा आहेत. त्यांच्याकडे 212 कोटी ऊपयांची संपत्ती आहे. 29 उमेदवारांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल असून 10 उमेदवारांविऊद्ध द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित गुन्हे दाखल आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article