Satara Municipal Election : साताऱ्यात अर्ज मागे घेण्यासाठी सुरु झाले राजकारण
सातारा नगरपालिकेतील निवडणुकीत अपक्ष - पक्षीय उमेदवारांमधील संघर्ष
सातारा : मंगळवारी छाननीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेच अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. जे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी ज्यांना अधिकृत तिकीट मिळाली आहे त्यांच्याकडून व पक्षाच्या नेत्यांकडून विनवणी सुरु करण्यात येत आहे. तर काहींनी सेटलमेंटसाठी अर्ज भरलेले असतात त्यांची सेटलमेंट झाली की असे उमेदवार आपले अर्ज मागे घेत असतात. त्यामुळे दि. २१ रोजी दुपारी ३ वाजता नेमके कोण रिंगणात असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अद्यापही सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पेच असणार आहे.
अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्या वॉर्डात जे अपक्ष आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी व विरोधक सक्षम असू नये, याकरता जे पक्षीय उमेदवार आहेत. त्यांची धडपड सुरु झाली आहे. दरम्यान, काही उमेदवारांनी तर प्रत्येक २१ पर्यंत कोण कोण मागे घेणार कोणाची होणार सेटलमेंट तर कोणाकडे भावनिक केली जाणार विनंती निवडणुकीत सेटलमेंट करण्यासाठी अर्ज दाखल करतात. तर काहीजण आपली हौस म्हणून तर काहीजण जनतेची सेवा करण्यासाठी करतात. अशातल्या सेंटलमेंट करणाऱ्या उमेदवारांच्या मागण्या मान्य झाल्या की त्यांचे अर्ज मागे घेतले जातात.
तर काहींना भावनिक विनंती तर शब्द देवून माघार घेण्याची विनंती केली जाते. त्यानुसार आता दि. २१ पर्यंत अशा राजकीय घडामोडी सुरु झाल्या असून अर्ज मागे कोण घेणार आणि कोण निवडणुकीच्या रिंगणात उरणार हे आज दुपारी समजेल.