महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजकारण युद्धक्षेत्र, सतर्क रहावे लागणार!

07:00 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टीव्हीकेच्या पहिल्या संमेलनात अभिनेता दलपति विजयचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/चेन्नई

Advertisement

प्रसिद्ध अभिनेता विजयचा पक्ष तमिलगा वेट्री कडगमचे (टीव्हीके) पहिले संमेलन तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्dयातील विक्रवंडी वी सलाई गावात आयोजित झाले. यात पक्षप्रमुख दलपति विजयने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्यावरून स्वत:चे विचार व्यक्त केले आहेत. यादरम्यान त्याने तामिळनाडू सरकारवरही निशाणा साधला आहे. राजकारण काही चित्रपटसृष्टी नसून एक युद्धक्षेत्र आहे. आम्ही जर गांभीर्याने निर्णय घेतले तरच या क्षेत्रात टिकू शकतो आणि विरोधकांना सामोरे जाऊ शकतो. आम्हाला मैदानात सतर्क रहावे लागणार असल्याचे विजयने म्हटले आहे.

आम्ही द्रविड राष्ट्रवाद आणि तमिळ राष्ट्रवादाला वेगळे करणार नाही. या दोन्ही गोष्टी या भूमीचे दोन नेत्रं आहेत. आम्हाला कुठल्याही विशिष्ट ओळखीपर्यंत मर्यादित ठेवायचे नाही. आमची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाची आहे. आम्ही त्याच आधारावर कार्य करणार आहोत. राजकारणात अपयश आणि यशाच्या कहाण्या वाचल्यावर मी स्वत:ची कारकीर्द शिखरावर असताना जनतेवर विश्वास ठेवून तुम्हा सर्वांचा विजय होत राजकारणात उतरलो आहे असे उद्गार विजयने उपस्थित समुदायाला उद्देशून काढले आहेत.

द्रमुक सरकार जनताविरोधी

तामिळनाडूत एक समूह एकच गाणे गात आहे. येथे जो कुणी राजकारणात उतरतो, त्याला विशिष्ट रंग दिला जातो आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. द्रविडियन मॉडेलच्या नावावर ते केवळ सौदेबाजी करत आहेत. द्रमुक सरकार जनताविरोधी असल्याचा आरोप विजयने केला आहे.

2026 मध्ये निवडणूक लढविणार

प्रसिद्ध अभिनेता विजयचा राजकीय पक्ष तामिळनाडूत 2026 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. विजयने फेब्रुवारी महिन्यात स्वत:च्या पक्षाची घोषणा केली होती. अलिकडेच त्याने या पक्षाचा ध्वज आणि निवडणूक चिन्ह जारी केले होते. तमिलगा वेत्री कझगमची निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाने या पक्षाला नोंदणीकृत राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या राजकारणात भाग घेण्याची अनुमती दिली आहे. तामिळनाडूत 2026 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article