तिरुपती लाडू प्रकरणी राजकारण सुरुच
वृत्तसंस्था / तिरुपती
आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादातील भेसळीच्या प्रकरणावरुन सत्ताधारी तेलगु देशम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातील राजकीय रणकंदन सुरुच आहे. प्रसादाच्या लाडूंमध्ये गाय आणि डुकराची चरबी मिसळ्याची कृती मागच्या सरकारच्या काळात झाली असून ही कृती आम्ही चव्हाट्यावर आणली आहे, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले होते. वायएसआर काँग्रेसने असा आरोप करणे हे पाप असल्याचे प्रतिपादन केले असून या कथित पापाच्या क्षालनार्थ तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण हाती घेतले आहे. या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी मंदिराचा परिसर पाण्याने स्वच्छ करण्यासमवेत पूजा कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते. तेलगु देशम पक्षाने मात्र ही जगनमोहन रेड्डीr यांची राजकीय नौटंकी असल्याची टीका केली आहे.
तिरुपती देवस्थानाप्रमाणेच वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी क्षमादान कार्यक्रमांचे आयोजन केले होते. चंद्राबाबू नायडूंचे आरोप धादांत खोटे असून केवळ संकुचित राजकारण साधण्यासाठी ते करण्यात आले आहेत, असा या पक्षाचा आरोप आहे. शुक्रवारी या पक्षाचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी त्यांची तिरुपती यात्रा स्थगित केली होती. भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी रे•ाr यांनी आपला भगवान व्यंकटेश्वरावर विश्वास आहे, अशा घोषणापत्रावर स्वाक्षरी करावी आणि देवस्थानाच्या नियमांचे पालन करावे, अशी मागणी तेलगु देशम पक्षाने केली होती. मात्र, ती जगनमोहन रेड्डी यांनी मान्य केली नाही.
नेत्यांचा सहभाग
या शुद्धीकरण आणि क्षमादान कार्यक्रमांमध्ये या पक्षाच्या अनेक राज्यस्तरीय आणि स्थानिक नेत्यांचा सहभाग होता. माजी मंत्री अंबाटी रामबाबू, एम. शर्मिला रे•ाr, तिरुपती देवस्थानचे माजी सदस्य बी. करुणाकर रे•ाr आदी नेते तसेच स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्ते यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली. नायडू यांनी या वादात प्रत्यक्ष देवाला ओढले आहे. तथापि, वायएसआर काँग्रेस पक्ष या संदर्भात पूर्णपणे निर्दोष आहे, असा दावा या पक्षाने केला आहे.