पर्यटनाच्या विरोधात राजकीय कारस्थान
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आरोप : टॅक्सीचालकांनी राजकीय नेत्यांना बळी पडू नये : टॅक्सीचालकांच्या कल्याणासाठी विविध योजना
पणजी : टॅक्सी चालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना दिलेली आहेत. त्यांच्या सर्व समस्यांवर तोडगा काढलेला आहे, मात्र टॅक्सीचालकांना अकारण चिथावून गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विरोधात काही राजकीय नेते कारस्थान करीत आहेत, असा आरोप कऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टॅक्सी चालकांच्या सर्व समस्या सोडविलेल्या आहेत, असे सांगितले. नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून सायंकाळी दैनिक ‘तरुण भारत’शी संपर्क साधला. ते आज सकाळी गोव्यात येत आहेत.
सरकारने टॅक्सीचालकांच्या सोडविलेल्या समस्या
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पेडणेतील टॅक्सीचालक म्हणजे भूमिपुत्रांकरीता आम्ही विमानतळावर खास काऊंटर खुला कऊन दिला आहे. ज्यामध्ये पेडणेतील टॅक्सीचालक आहेत. विमानतळावर प्रवेश शुल्क रु. 200 होते, ते रु. 80 पर्यंत खाली आणले आहे. टॅक्सीचालकांसाठी केवळ 5 मिनिटांचा कालावधी होता तो 10 मिनिटांपर्यंत वाढवून दिला आहे. आता यानंतर आपण त्यांना विमानतळावर जाण्यासाठी जो नवा पूल उभारलेला आहे त्यावऊन जाण्यासाठी जो टोल आहे त्यातून देखील गोव्यातील टॅक्सीचालकांना भरीव सूट देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोणतेही प्रश्न शिल्लक नाहीत
टॅक्सीचालकांच्या कल्याणासाठी सर्व त्या उपाययोजना सरकारने हाती घेतलेल्या आहेत. आता टॅक्सी चालकांचे कोणतेही प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत. जर कोणत्याही समस्या असतील तर टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने थेट आपल्याला येऊन भेटावे. अकारण काहीजण जे राजकीय लाभ उठवू पाहत आहेत, अशा व्यक्तींच्या नादी न लागता सरकारसमोर आपले प्रश्न मांडावेत. टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घ्यावा.
विरोधकांनी फूस लावून पुकारला संप
काही राजकीय नेत्यांना कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही, त्यामुळे ते गोव्याचे पर्यटन नष्ट कऊ पाहत आहेत. या राजकीय नेत्यांना गोव्याचे पर्यटन बंद करण्याची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी टॅक्सीचालकांना फूस लावून संप पुकारण्याचे अस्त्र आपल्या हाती घेतलेले आहे. टॅक्सीचालकांनी या राजकीय नेत्यांच्या नादी लागू नये.
टॅक्सीचालकांवर विपरित परिणाम होईल
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या समोर समस्या निर्माण केल्या तर गोव्याचे पर्यटन क्षेत्र कोसळणार आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांवरही त्याचा विपरित परिणाम होईल. त्यामुळे टॅक्सीचालकांनी संप मागे घेऊन आपले प्रश्न थेट आपल्याशी चर्चा कऊन सोडवावेत. विनाकारण विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन संपाचे शस्त्र उगाऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी टॅक्सीचालकांना केले.
खंवटे, गुदिन्होंसह भेटले उड्डाणमंत्र्यांना
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह केंद्रीय हवाई उड्डाणमंत्र्यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि दाबोळी विमानतळ व आसपासच्या परिसराचे सौंदर्य वाढवावे. या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी विदेशी विमानांचे कनेक्शन द्यावे. नवी विमाने सुऊ करावीत आणि दोन्ही विमानतळांवर समान वाहतूक व्हावी या दृष्टीकोनातून प्रयत्न करावे, असे आवाहन केले.