For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Politics : कागलमध्ये राजकीय महाभूकंप! मुश्रीफ–राजे गटाची जंगी आघाडी

01:31 PM Nov 19, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur politics   कागलमध्ये राजकीय महाभूकंप  मुश्रीफ–राजे गटाची जंगी आघाडी
Advertisement

                                           कागलची गेमचेंजर युती! सत्तेपेक्षा विकासाचा नारा

Advertisement

कागल : कागलच्या राजकारणात मुश्रीफ व राजे गटात पहिल्यांदाच आघाडी होते असे नाही. यापूर्वीही २०११ ते २०१६ या कालावधीत नगरपालिकेत मुश्रीफ-राजे गटाची सत्ता होती, याकाळात आम्ही दोघांनी केलेला विकासात्मक कारभार आजही कागलच्या जनतेसमोर आहे. आत्ताच्या निवडणुकीतही आम्ही सत्तेसाठी नव्हे तर कागलच्या सर्वांगीण विकासाठी व जनतेच्या भल्यासाठी एकत्र आलो असल्याची स्पष्टोक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली,

तसेच दोन्ही गटातील संघर्षामुळे कार्यकर्त्यांचे होणार नुकसान टाळण्यासाठीही आम्ही काही पाऊले उचलली असल्याचेही दोन्ही नेत्यांनी सांगितले. कागल, मुरगूड नगरपालिकेत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची आघाडी झाली आहे. त्यांनी मंगळवारी, कागल येथील मटकरी हॉल येथे दोन्ही आघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा घेतला. मेळाव्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'कागलच्या राजकारणात अशा आघाडया यापूर्वी झाल्या आहेत. शामराव भिवाजी पाटील, सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे, मी व संजय घाटगे यांच्यामध्ये राजकीय संघर्षही झाला. नंतर आघाड्याही झाल्या. कागलच्या विकासासाठी आणि राजकीय संघर्ष संपविण्यासाठी मी व समरजितसिंह एकत्र आलो आहे. अनपेक्षितरित्या झालेल्या आमच्या आघाडीमुळे काही जणांचे गैरसमज झाले असतील तर ते दूर करू समरजितसिंह घाटगे आणि आमची युती आगामी काळातही कायम राहिल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Advertisement

समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'वरिष्ठ पातळीवरुन आमच्यातील तीव्र संघर्ष मिटवण्याचे ठरले. बैठक झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी या घडामोडी झाल्या. दोन्ही गटातील संघर्षात कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री मुश्रीफ आणि मी दोघांनीही काही पावले पुढे टाकली. या कालावधीत कार्यकर्त्यांशी चर्चा करायला वेळ मिळाला नाही. यामुळे आम्ही दोघांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. विकासात्मक कामासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. अदृश्य शक्तीचा हात असेल तर ही आमची युती आगामी काळात बरीच वर्षे टिकेल. आमच्या दोघांत उत्तम समन्वय असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला अखिलेशराजे घाटगे, रणजित पाटील, युवराज पाटील, भैय्या माने, प्रकाश गाडेकर, चंदकांत गवळी, राजेखान जमादार, अमरसिंह घोरपडे, एम. पी. पाटील, सुनिल मगदूम, कृष्णात पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, सचिन मगदूम, विकास पाटील, शितल फराकटे, संविता माने आदी उपस्थित होते.
योग्य वेळी सर्व पत्ते खुले करणार पत्रकार परिषदे दरम्यान वरिष्ठ पातळीवर म्हणजे नेमके कोणी ही आघाडी घडवून आणली? भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला काय या प्रश्नावर समरजितसिंह घाटगे यांनी यावर आपण योग्य वेळी बोलू, सगळे पत्ते खुले करू, असे सांगत याविषयी जादा बोलणे टाळले.

जय घाटगे, अंबरीश घाटगे यांची आज भेट

मंत्री मुश्रीफ यांनी माजी आमदार संजय घाटगे व गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे यांची आज बुधवार १९ रोजी भेट घेऊन चर्चा करणार आहे. ते खासदार होतील का आमदार होतील हे त्यांचे वरिष्ठ ठरवतील. ते युतीचे घटक आहेत. मी, समरजित व संजय घाटगे असे तिघेही आम्ही युतीचे घटक असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. भैय्या मानेंना आमदार करणार समरजितसिंह घाटगे यांचे भविष्य काय असेल हे मला माहीत नाही. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांना मात्र पदवीधर मतदारसंघातून आमदार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

त्यांना अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती

कागल नगरपालिकेत समरजितसिंह घाटगे व आमची आघाडी झाल्यावर माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रसार माध्यमातून माझ्यावर टीका केली. त्यांनी ज्या शब्दांत टीका केली ते योग्य नाही. आमच्या आघाडीवरुन मंडलिक यांना इतके अस्वस्थ होण्याची आवश्यकता नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.