कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्समध्ये राजकीय संकट गडद

06:14 AM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बायरू सरकार कोसळले : अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

फ्रान्सच्या संसदेत झालेल्या विश्वासमत चाचणीत पंतप्रधान फ्रान्स्वा बायरू यांचे सरकार कोसळले आहे. बायरू यांचे सरकार विश्वासमत गाठण्यास अयशस्वी ठरले आहे. यामुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना मोठा झटका बसला आहे.  बायरू सरकारच्या बाजूने 194 तर विरोधात 364 मते पडली आहेत. यामुळे अध्यक्ष मॅक्रीन यांना 12 महिन्यांमध्ये चौथ्यांदा नवा पंतप्रधान शोधावा लागणार आहे.

मॅक्रॉन यांचे दीर्घकालीन राजकीय सहकारी फ्रान्स्वा बायरू यांना मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले होते. विश्वासमत गाठता न आल्याने बायरू यांना आता मॅक्रॉन यांच्याकडे राजीनामा सोपवावा लागणार आहे.

फ्रान्स्वा बायरू यांनीच विश्वासमताचा प्रस्ताव संसदेत मांडला होता. तसेच मतदानापूर्वी त्यांनी सरकारच्या खर्चात कपात आणि फ्रान्सचे वाढते कर्ज कमी करण्याच्या उपायांचे समर्थन करण्याचे आवाहन केले होते. तर डावे पक्ष आणि उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी या संधीचा वापर सरकार पाडण्यासाठी केला आहे. फ्रान्सची वाढती राजकोषीय तूट आणि वाढते कर्ज भविष्यासाठी धोका असल्याची भूमिका बायरू यांनी संसदेतील भाषणात मांडली होती.

मॅक्रॉन यांच्या अडचणीत वाढ

बायरू यांचे सरकार कोसळल्याने फ्रान्समध्ये राजकीय संकट गडद होत चालले आहे. मतदानानंतर जहाज डाव्या विचारसरणीच्या फ्रान्स अनबोड बार्टीच्या प्रमुख मॅटिल्ड पॅनोट यांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मागील धोरणावर कायम राहणारा आणखी एक पंतप्रधान आम्ही इच्छित नाही. आता जनतेच्या इच्छेचा सन्मान करण्यास नकार देणाऱ्या अध्यक्षांचा प्रश्न उभा ठाकला असल्याचे वक्तव्य पॅनोट यांनी केले.

मॅक्रॉन यांच्यावर वाढता दबाव

प्रमुख विरोधी पक्षाच्या मागणीनंतर मॅक्रॉन यांच्यावरील दबाव वाढला आहे. मॅक्रॉन यांनी मागील 12 महिन्यांमध्ये 3 पंतप्रधान पायउतार होताना पाहिले आहेत.  जून 2024 मध्ये मजबूत जनादेशाच्या इच्छेपोटी नॅशनल असेंबली भंग करण्याचा निर्णय मॅक्रॉन यांनी केला होता, परंतु त्या निवडणुकीत कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तर अति-डावे आणि उजव्या विचासरणीचे पक्ष प्रभावी ठरले होते. तेव्हापासूनच मॅक्रॉन यांच्या मध्यममार्गी सरकारला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचदरम्यान अर्थसंकल्पात कपात आणि विश्वासमत चाचणीचा बायरूंचा डाव अंगलट आला आहे.

Advertisement
Next Article