कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur Crime : सांगोला भागातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई

06:10 PM Nov 11, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                          पंढरपूर पोलिसांचा छापा; 45 जुगारपट्ट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisement

पंढरपूर : ऐन नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाने व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगोला तालुक्यातील कोळा या गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून एक कोटी १९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांनी कोळा (ता. सांगोला, जि.सोलापूर) येथे अंकुश आनंदा अलदर त्याच्या कोळा शिवारातील शेडनेटमध्ये लोकांना जमवून विनापरवाना जुगार अड्डा चालवित असल्याची बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. रविवारी कोळा येथे दुर्गम डोंगराळ भागामध्ये जाऊन अंकुश अलदर याच्या जुगार अड्ड्यावर छापा कारवाई केली आहे.

कोळा येथील शेडनेटच्यामध्ये लाकडी ६ टेबलवर गोलाकार करून जुगार खेळण्याकरिता आलेल्या व्यक्तींकडे दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रोख रक्कम, जुगार खेळण्याकरिता वापरात आणलेली रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल, जुगार साहित्य, ५२ पानी पत्याचे डाव, पत्राशेड/शेडनेटमध्ये असलेले खुर्चा, टेबल, गॅस सिलेंडर व शेगडी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये रोख रक्कम ४ लाख १७ हजार ५७७ रुपये, टेबल, खुर्चा, जुगार खेळण्याचे साहित्य, फ्रीज, पत्यांचे डाव असलेले बॉक्स आदी साहित्य व मोबाईल फोन, ११ चारचाकी वाहने, १४ दुचाकी वाहने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत सांगोला पोलीस ठाणेस ४५ जुगार खेळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुलहमीद शेख, ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील, नितीन जगताप, महादेव पिसाळ, ढवळे, निलेश रोंगे, कामतकर, कांबळे, विनोद शिंदे माने, देशमुख, साळुंखे, शिंदे, गरड, शेख, आटपाडकर, जाधव, घोडके, पाटील, देवकते, भोसले काकडे, नरळे, सागर गवळी, चौगुले, टिंगरे, वैभव घायाळ, सूर्यवंशी व चालक गोडसे यांनी पार पाडलेली आहे.

Advertisement
Tags :
#GamblingDen#PoliceRaid#SeizedVehicles#solapur crime news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediapandharpur
Next Article