कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंचमसाली लिंगायत समाजाचा मोर्चा पोलिसांनी रोखला

12:47 PM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजीसह नेते, आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात : 2ए मध्ये समावेश करण्यासाठी समाजाच्यावतीने आंदोलन

Advertisement

बेळगाव : पंचमसाली लिंगायत समाजाचा समावेश 2ए मध्ये करावा या मागणीसाठी गतवर्षी सुवर्ण विधानसौधवर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी 10 डिसेंबर 2024 रोजी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पंचमसाली लिंगायत समाजाची शहरातून सुवर्णसौधच्या दिशेने निघालेला मोर्चा पोलिसांनी आरटीओ सर्कल येथे रोखून कुडलसंगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी, आमदार बसनगौडा यत्नाळ पाटील यांच्यासह नेते व मोर्चात सहभागी झालेल्यांना ताब्यात घेतले.

Advertisement

पंचमसाली लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे तसेच 2ए मध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून समाजाच्यावतीने आंदोलन केले जात आहे. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला जात आहे. गतवर्षी कुडलसंगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्त्वाखाली सुवर्णसौधवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. सुवर्णसौधच्या दिशेने निघालेला मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले होते.

मात्र महामार्गावर येवून बॅरिकेड्सचे कडे आंदोलनकर्त्यांनी तोडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.यामध्ये आंदोलनकर्त्यांसह पोलीसदेखील मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. या घटनेला बुधवारी 10 डिसेंबर रोजी वर्षपूर्ती होत आहे. त्यामुळे पंचमसाली लिंगायत अत्याचार दिनानिमित्त बुधवारी शहरातील गांधीभवन येथून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांनी काळ्यापट्या बांधून घेण्यासह हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला.

मोर्चा चन्नम्मा चौकात आल्यानंतर स्वामीजींसह प्रमुख नेत्यांनी रस्त्यावर ठिय्या करत सरकारला इशारा दिला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चन्नम्मा चौकातून आरटीओ सर्कलमार्गे सुवर्ण विधानसौधकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी आरटीओ सर्कलमध्येच रोखला व स्वामीजींसह नेत्यांना व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात सी. सी. पाटील, अरविंद बेल्लद, सिद्धू सवदी यांच्यासह नेतेमंडळी व पंचमसाली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

पंचमसाली लिंगायत समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गांधीभवन ते चन्नम्मा सर्कल आणि आरटीओ सर्कल दरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने नजर ठेवली होती. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये जेणेकरून मोर्चाला गालबोट लागेल यासाठी देखील विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article