महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहापूर परिसरात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन

10:49 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी : जिल्हा जलद कृती दलाच्या तुकड्याही सहभागी

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व ती खबरदारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पथसंचलन केले होते. त्यानंतर मंगळवारी शहापूर, खासबाग या परिसरात पथसंचलन केले. पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन केले आहे. यामध्ये विविध पोलीस दलाच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

विष्णू गल्ली, वडगाव येथून पोलिसांच्या पथसंचलनाला सुरुवात झाली. संपूर्ण वडगाव, त्यानंतर खासबाग परिसरातील मुख्य रस्त्यांवरून पथसंचलन करून पोलिसांनी शक्तिप्रदर्शन केले. शहापूर परिसरातील गल्ल्यांमधून पथसंचलन करून  शिवाजी उद्यान येथे पथसंचलनाची सांगता केली. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, खडेबाजार एसीपी शेखरप्पा एच. यांच्यासह इतर पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग दर्शविला होता.

शहराबरोबरच शहापूर येथेही गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते. शहापूर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सर्व ती तयारी पूर्ण केली असून आपले शक्तिप्रदर्शन दाखवून दिले आहे. या पथसंचलनामध्ये जिल्हा जलद कृती दलाच्या तुकड्याही सहभागी झाल्या होत्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article