Kolhapur Crime| कोल्हापुरात तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; 33 लाखांचा मुद्देमाल जप्त
करवीर पोलिसांची कारवाई : क्लब मालकासह तेरा जणांना अटक
कोल्हापूर : पाचगाव गिरगाव रस्त्यावरील आण्णा पाटील नगरातील एका बंगल्यात सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्यावर करवीर पोलिसांनी छापा टाकला, क्लब चालकासह तेरा जणांना अटक केली. तर चार जण पळून गेले. त्याच्याकडून १ लाख २५ हजारांची रोकड आणि २ लाख ५ हजार रुपयांचे आठ मोबाईल, २ लाख ७५ हजारांच्या तीन दुचाकी, २४ लाख रुपयांच्या दोन चारचाकी, ३ लाख रुपयांची एक रिक्षा असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
क्लब मालक संतोष गायकवाड (रा. जोशीनगर, झोपडपट्टी, संभाजीनगर, ता. करवीर), जुगार खेळणारे अरविंद सखाराम कुचेकर (रा. आराम चौक शेजारी, राजेंद्रनगर, कोल्हापूर), अनिकेत बळवंत कदम (रा. यवलुज, ता. पन्हाळा), प्रकाश विष्णू बुचडे
(रा. माळवाडी, यवलुज, ता पन्हाळा), उत्तम राजेंद्र भोसले (रा. उद्यमनगर मेन रोड, कोल्हापूर), अतिष गोरोबा कांबळे (रा. जोशीनगर झोपडपट्टी, कोल्हापूर), कुणाल रणजित परमार (रा. सी कासार गल्ली, गुजरी, कोल्हापूर), सागर खंडु कांबळे (रा. राधाकृष्ण शाळेनजीक राजेंद्रनगर, कोल्हापूर), योगेश मोहन सुर्यवंशी,
सौरभ अशोक पवार (दोघे रा.घिसाड गल्ली, सोमवार पेठ, कोल्हापूर), अमित बुकशेट (रा. कसबा बावडा, कोल्हापूर), रवी सोनटक्के (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. तर तीन ते चारजण पोलिसांची चाहुल लागताच घटनास्थळावरुन पळून गेले आहे. पळून गेलेल्याचा शोध सुरु केला आहे. रात्री उशिरापर्यंत ते चौघे जण पोलिसांना मिळून आले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले, पाचगाव गिरगाव (ता. करवीर) रस्त्यावरील आण्णा पाटील नगरातील संजय बोटे यांच्या बंगल्यात गेल्या काही महिन्यापासून अवैधपणे तीन पानी जुगार क्लब सुरु आहे. अशी माहिती करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला बातमीदाराकडून समजली. त्यावरुन या क्लबवर मंगळवारी रात्री छापा टाकला. यावेळी या क्लबमध्ये क्लब मालक योगेश सुर्यवंशीसह बंगला मालक संजय बोटे या दोघासह १७ जण तीन पानी जुगार खेळत होते. यासर्वाची धरपकड करीत असताना चार जण घटनास्थळावरुन पळून गेले.
संशयितामध्ये प्रतिष्ठीत घराण्यातील तरुण
माचगाम गावच्या हद्दीतील आण्णा पाटील गगरातील तीन पाणी जुगार मलयबर पोलिसांनी छापा टाकू तथा लाखांच्या रोकडीत १३ लाखांचा मुद्देमाल जमा केला आहे. अटक केलेल्या १३ जणामध्ये प्रतिष्ठीत पराण्यातील एका तरुणा आणि पोलीस रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराचा समावेश आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
जुगार अड्यावर छापा, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कागल : कागल ते पंचताराकिंत एमआडीसीकडे जाणारे रोडवर भोसले मळा येथे आप्पा भुरले यांचे शेतातील घरातील खोलीत रम्मी जुगार खेळणाऱ्या पाच जणांना छापा टाकून पकडले. त्यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुमार नायकु अलासे (वय ३८, रा. गौटणपुर गल्ली, कुरुंदवाड ता. हातकंणगले), महादेव शामराव भास्कर (वय ६५, जवाहरनगर, कोल्हापूर), जमीर रफिक बागवान (वय ४३, बेळगांव नाका, निपाणी ता. चिक्कोडी), अशोक ज्ञानदेव सुतार (वय ५०, रा. वाळवेकरनगर, हुपरी ता. हातकंणगले), राजकुमार आण्णाप्पा पोवार (वय ४४, संभाजी मानेनगर, हुपरी ता. हातकंगणले) व आप्पा भुरले (रा. कागल) अशी त्यांची नावे आहेत. यांच्याकडून पाच मोबाईल व रोख ३३ हजार ६०० रुपये असा ६६ हजार १०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.