For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

उमरगा येथे पोलिसांचा लॉजवर छापा

02:09 PM Dec 31, 2023 IST | Kalyani Amanagi
उमरगा येथे पोलिसांचा लॉजवर छापा

उमरगा प्रतिनिधी

Advertisement

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉज वर पोलिसांचे छापासत्र सुरू आहे. दरम्यान उमरगा येथील एका लॉजवर महिलेस वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी संबंधित लॉजवर छापा टाकत कारवाई केली आहे.

उमरगा येथील शांतादुर्ग लॉजवर लॉज मालक, मॅनेजर आणि वेटर यांनी संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेस आश्रय देऊन वेश्या व्यवसाय करण्यासाठी परावृत्त केले होते. याची माहिती मिळताच पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका केली आहे. तर लॉज मालक आशा तेलंग, मॅनेजर धनराज तेलंग आणि वेटर रविंद्र महतो यांच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :
×

.