Satara News : सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी ; संभाजी ब्रिगेड यांची मागणी
स्थायी पोलीस चौकीसाठी संभाजी ब्रिगेडचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन
सातारा : सातारा सिव्हल हॉस्पिटल हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालया असून दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. विशेषतःस्था आपत्कालीन विभागात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे अशा ठिकाणी गर्दी वादवीवाद मारामाऱ्या डॉक्टर व कर्मचारी यांच्या वर होणारे हल्ले तसेच रुग्ण व त्यांच्या कुटुंबियाना भेडसावणाऱ्या सुरक्षेच्या समस्या सातत्याने वाढत चालल्या आहे
अनेकदा उपचारास होणारा विलंब आपत्कालीन परिस्थिती रुग्णवाहिकेतील हुशीर तेसच बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या वादामुळे हॉस्पिटलमध्ये असुरक्षित वातावरण तयार होत आहे यामुळे रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य सेवक यांच्यात दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल परिसरात स्थायी पोलीस चौकी स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी तत्काळ कारवाई होऊन शिस्त व सुरक्षिता राखली जाईल असे निवेदन संभाजी ब्रिगेड तर्फे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले
यावेळी जिल्हा अध्यक्ष रफीक शेख जिल्हा उपाध्यक्ष ,ऍड दशरथ निकम ,जिल्हा संघटक महेश गराटे ,जिल्हा सचिव महेबूब पठाण ,ता,अध्यक्ष सत्यवान मोरे ,सातारा सोशल मीडिया अध्यक्ष संकेत भोईटे ,सातारा शहर अध्यक्ष अमोल नलावडे,आशिष खवळे,इम्रान कच्ची नाजीम बागवान ,इत्यादी उपस्थितीत होते