For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिरनवाडी येथे ‘त्या’ वृद्धाला पोलिसांची मदत

10:38 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पिरनवाडी येथे ‘त्या’ वृद्धाला पोलिसांची मदत
Advertisement

वार्ताहर /मजगाव

Advertisement

पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा मूर्तीनजीक एक वृद्ध दुभाजकावर शनिवारी सायंकाळी वळिवाच्या जोरदार पावसात भिजत होता. दमदार पावसाच्या सरीमुळे तो थंडीने कुडकुडत होता. पण कोणीच पुढे जावून त्यांना हात दिला नाही. मात्रकेइसआरपीच्या दोन पोलिसांनी भर पावसात भिजत त्या वद्धाला नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आणून बसविले.  त्यानंतर त्याची चहा, बिस्किटची सोय करून पाऊस थांबल्यानंतर पिरनवाडी येथील त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहचविण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याचे नाव नजीर महमद भोजगार (वय 80) ते मूळचे तांबीट गल्ली शहापूर येथील असल्याचे समजले. त्या दोन पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी महादेव शहापूरकर व जोतिबा पाटील यांनीही मदत केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.