धास्तीने व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त
10:23 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : सीमावासियांच्या व्हॅक्सिन डेपो मैदानावर होणाऱ्या महामेळाव्याला बेळगाव प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे सीमावासियांनी शिनोळी फाट्यावर आंदोलन करण्याचे ठरविले. मात्र, न जाणो समिती नेते किंवा कार्यकर्ते व्हॅक्सिन डेपो मैदानावर गनिमीकाव्याने दाखल होतील, या धास्तीने व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इतकेच नव्हे तर व्हॅक्सिन डेपोकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून रोखण्यात आले होते.
Advertisement
Advertisement