महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रिया यादवला पुन्हा पोलिसी पाहुणचार

12:55 PM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बोर्डे डिचोलीत गंडविले चार बहिणींना चौघांचेही 79 लाखांचे दागिने केले हडप 

Advertisement

डिचोली : बोर्डे डिचोली तेथील जयंती रघुनाथ वायंगणकर व तिच्या तीन बहिणींना जमीन मालमत्ता खरेदी करायची आहे, रेल्वे स्थानकावर स्टॉल खरेदी करायचे आहे, अशी कारणे सांगून सुमारे 79 लाख ऊपयांना गंडविल्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी ठकसेन प्रिया यादव हिला पुन्हा अटक केली आहे. सर्वप्रथम दलवाई नामक एका व्यक्तीकडून रेल्वे खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 50 लाख उकळल्याच्या तक्रारीवरून प्रिया यादव हिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या चार बहिणींनी आपणासही गंडविल्याची तक्रार डिचोली पोलिसस्थानकात नोंदवली होती.

Advertisement

गेल्या 2017 ते 2024 या कालावधीत संशयित प्रिया यादव हिने आपणास 35 लाख ऊपये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. वारंवार जमीन मालमत्ता खरेदी करण्याचे, रेल्वे स्टॉल्स खरेदी करण्याचे व इतर खोटी कारणे सांगून पैसे मागितले. त्यामुळे वायंगणकर यांनी प्रिया यादवला 2 बांगड्या, 3 अंगठ्या, 1 ब्रेसलेट असे सोन्याचे दागिने दिले होते. परंतु ठराविक वेळेत सदर दागिने किंवा पैसे न देता ठकविले.

प्रियाने तक्रारदार जयंती वायंगणकर यांच्या बहिणींकडूनही पैसे व सुवर्णलंकार उकळले आहेत. बहीण ललिता यांच्याकडून 36 लाख ऊपये व 116.630 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, मिलन यांच्याकडून साडेचार लाख ऊपये व पूर्णा यांच्याकडून 3. 73 लाख ऊपये जमीन खरेदी, रेल्वे स्टॉल खरेदी करण्याच्या बहाण्याने उकळले होते. परंतु ते परत न करता फसवणूक केली. असे तक्रारीत म्हटले आहे. डिचोली पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article