महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलीस आयुक्तांचा शहरात फेरफटका

03:23 PM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अखंड भारत संकल्प दिन : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री विसर्जन मार्गाची पाहणी

Advertisement

बेळगाव : अखंड भारत संकल्प दिन व आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत शहरातील प्रमुख मार्गांचा फेरफटका मारला. 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री नरगुंदकर भावे चौक व टिळक चौक परिसरात अखंड भारत संकल्प दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी या दोन्ही ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. नरगुंदकर भावे चौकपासून टिळक चौक व तेथून कपिलेश्वर तलावापर्यंत त्यांनी पायपीट केली. श्री विसर्जन मिरवणूक मार्गाबरोबरच विसर्जन तलावांचीही पाहणी करून आपल्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यू., खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर आदी अधिकारीही उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article