कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आठ लाखांचा घोडा पळविणाऱ्यांना पोलिसांकडून लगाम

12:40 PM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बोलेरो-दुचाकीसह दोघा जणांना अटक : घोड्याची प्रतिकृती चोरल्यानंतर वितळविली : 246 किलो कांस्य जप्त 

Advertisement

बेळगाव : सिद्धकलानगर, अनगोळ येथील एका मूर्तीशाळेतून सात क्विंटल कांस्याची (ब्रांझ) घोड्याची प्रतिकृती चोरल्या प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो मॅक्स व एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. 2 मे रोजी सायंकाळी 5.30 ते 3 मे च्या सकाळी 6 यावेळेत अनगोळ येथील सिद्धकलानगरमधील मूर्तीशाळेतून घोड्याच्या प्रतिकृतीची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी 19 मे रोजी दिव्या सागर पोतदार, राहणार भांदूर गल्ली, अनगोळ यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे.

Advertisement

गौतम अजित देसाई (वय 19) राहणार महावीर गल्ली, कुट्टलवाडी, रवी सुरेश अरळप्पन्नावर (वय 19) राहणार ब्रह्मनगर, मजगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, महेश पाटील, एस. एम. करलिंगन्नावर, लाडजीसाब मुलतानी, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, महम्मद लष्करी व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. घोड्याची प्रतिकृती चोरल्यानंतर ती वितळवण्यात आली होती. 246 किलो कांस्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्याची किंमत 1 लाख 10 हजार 700 रुपये इतकी होते.

चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो व एक दुचाकी असा एकूण 6 लाख 70 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. मूर्तीशाळेतून प्रत्यक्षात सुमारे 8 लाख रुपये किमतीची 700 किलो वजनाची घोड्याची प्रतिमा चोरण्यात आली होती. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात आला असून पोलीस आयुक्तांनी या पथकाचे कौतुक केले आहे. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याची चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article