Satara Crime : वाईत शस्त्र तस्करावर पोलिसांची कारवाई!
पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानुसार कारवाई
सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांदर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानुसार बाई पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. या मोहिमेत अग्निशस्त्र तरकरी आणि धमकावणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांत असलेल्या अविनाश मोहन पिसाळ (रा. बावधन, ता. बाई) याच्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
पिसाळ याच्यावर बाई पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे,सादर दंडाधिकाऱ्यांनी धमकावणे यांसह एकूण चार गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी कारवायांचा तपास करून त्याचा हद्दपार प्रस्ताव वाई उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे करण्यात आला. सुनावणीनंतर, उपविभागीय अविनाश पिसाळ यास जिल्ह्यातून पुढील दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कहुकर, बाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार अमित सपकाळ, नितीन कदम यांनी केली.