For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोंद नसणाऱ्या 344 वाहनांवर पोलिसांची कारवाई

11:06 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोंद नसणाऱ्या 344 वाहनांवर पोलिसांची कारवाई
Advertisement

वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना पोलीस आयुक्तांचा इशारा

Advertisement

बेळगाव : नोंद नसणारी वाहने गैरकृत्यांसाठी वापरली जात असल्याचे पोलीस खात्याच्या निदर्शनास आले आहे. यावरून रहदारी विभागाकडून शहरामध्ये वाहनांची तपास मोहीम राबविण्यात आली आहे. या माध्यमातून 344 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.शहरामध्ये चेनस्नॅचिंग, दरोडे, घरफोड्या आदी गैरकृत्यांची वाढ झाली आहे. या कृत्यांसाठी नोंदणी नसणाऱ्या वाहनांचा वापर केला जात असल्याचे पोलीस खात्याच्या निदर्शनास आले आहे. यासाठी रहदारी विभागाकडून विशेष मोहीम राबवून वाहन तपासणी करण्यात आली आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली आहे. नोंद नसणारी, नोंद असूनही नंबरप्लेट न घातलेले वाहनाच्या मागील व पुढील भागी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली.

दिवसभरात 344 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 266 वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर 78 संशयास्पद वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. सदर वाहनांची कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. अशा प्रकारे कारवाई केलेल्या 160 वाहनांची प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. शहरामध्ये डिफेक्टीव सायलेन्सर लावून वाहने चालविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. याबरोबरच बेपर्वाईपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, तीनसीट घालून वाहने चालविण्याचे निदर्शनास येताच दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रहदारी पोलीस विभागाकडून देण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबत कडक इशारा दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.