पोलंडची पेगुला अजिंक्य
वृत्तसंस्था/ बॅड होमबर्ग (जर्मनी)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या होमबर्ग खुल्या ग्रासकोर्ट महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडची माजी टॉप सिडेड जेसिका पेगुलाने अजिंक्यपद पटकाविताना स्वायटेकचा पराभव केला.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पेगुलाने स्वायटेकचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. 2025 च्या टेनिस हंगामातील पेगुलाचे हे तिसरे जेतेपद आहे. यापूर्वी तिने ऑस्ट्रीन, टेक्सास आणि चार्लस्टन येथील स्पर्धा जिंकल्या आहेत. स्वायटेकला या स्पर्धेच्या मानांकनात चौथे स्थान मिळाले होते. अलिकडच्या वर्षभराच्या कालावधीत स्वायटेकला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. पोलंडच्या 24 वर्षीय पेगुलाने 2024 नंतर ही पहिली स्पर्धा जिंकली आहे. 2024 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिने अजिंक्यपद मिळविले होते. गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पेगुलाने स्वायटेकला नमविले होते. आता सोमवारपासून लंडनमध्ये विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत असून पेगुला आणि स्वायटेक या दोन्ही महिला टेनिसपटू दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विम्बल्डन स्पर्धेत आतापर्यंत पेगुलाला उपांत्यपूर्व फेरी पार करता आलेली नाही.