पोलंड, इटली अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिली जीन किंग चषक सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंड आणि इटली यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना अनुक्रमे झेक प्रजासत्ताक आणि जपानचा पराभव केला. इगा स्वायटेकच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पोलंडने या स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात पोलंडने झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. या लढतीत सुरुवातीला झेक प्रजासत्ताकने आघाडी घेतली होती. झेकच्या बोझकोव्हाने पोलंडच्या मॅगडेलेना फ्रेचचा पराभव केला होता. त्यानंतर इगा स्वायटेकने लिंडा नोस्कोव्हाचा पराभव करुन पोलंडला बरोबरी साधून दिली. निर्णायक दुहेरीच्या सामन्यात स्वायटेक आणि केवा या जोडीने झेकच्या बोझकोव्हा आणि सिनियाकोव्हा यांचा 6-2, 6-4 असा पराभव केला. या पराभवामुळे झेकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पोलंडने या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे.
दुसऱ्या उपांत्य लढतीत इटलीने जपानचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 2023 साली या स्पर्धेत इटलीने उपविजेतेपद पटकाविले होते. या लढतीतील पहिल्या सामन्यात शिबाहेराने इटलीच्या कोसिरेटोचा पराभव करुन जपानला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर जस्मिन पाओलिनीने एकेरीचा सामना जिंकून इटलीला बरोबरी साधून दिली. निर्णायक दुहेरीच्या सामन्यात पाओलिनी आणि सारा इराणी यांनी जपानच्या अयोयामा आणि होजुमी यांचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. आता या स्पर्धेत कॅनडा आणि ब्रिटन तसेच ऑस्ट्रेलिया आणि स्लोव्हाकिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.