For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबमध्ये विषारी दारूचे तांडव

06:04 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंजाबमध्ये विषारी दारूचे तांडव
Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अनेक बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ संगरूर

पंजाबमध्ये मागील 4 दिवसांमध्ये विषारी दारूने अनेकांचा बळी घेतला आहे. याचदरम्यान पीडित कुटुंबांची मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगरूर येथे जात भेट घेतली आहे. संगरूर हा मुख्यमंत्री मान यांचा जिल्हा आहे. याचबरोबर हरपाल चीमा आणि अमन अरोडा हे दोन मंत्री देखील याच जिल्ह्यातील आहेत.

Advertisement

संगरूरमध्ये दारूचा व्यवसाय उघडपणे चालतो, स्वस्त आणि खुली दारू देण्याचे आमिष दाखवत लोकांना मरण्याच्या दारात लोटले जात आहे. संगरूर जिल्ह्यात विषारी दारूमुळे चार दिवसांमध्ये 21 जणांचा बळी गेला आहे. बुधवारी गुज्जरां गावात 4, गुरुवारी पाच, शुक्रवारी सुनाम येथे 8 तर शनिवारी आणखी 4 जणांचा मृत्यू विषारी दारू प्राशन केल्याने झाला आहे.

याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक गुरिंदर ढिल्लों यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय एसआयटी तपास करणार आहे. अकाली दल आणि भाजपने याप्रकरणी आप सरकारला धारेवर धरत पीडितांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

पंजाबमध्ये दारूमाफियांचे राज्य

पंजाबमध्ये दारू माफियांचा सुळसुळाट झाला आहे. हे मोठे रॅकेट असून यात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आणि अबकारी मंत्र्याच्या मतदारसंघातच विषारी दारूचा व्यवसाय फोफावला असल्याचा आरोप काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैहरा यांनी रविवारी केला आहे. यापूर्वी अमृतसरमध्ये विषारी दारूने अनेकांचा बळी घेतल्यावर  भगवंत मान यांनी खासदाराच्या स्वरुपात हत्येचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. परंतु आता त्यांचेच सरकार असताना राज्यात विषारी दारूमुळे अनेकांचा जीव गेला आहे. याकरता आप सरकार थेट जबाबदार आहे. भटिंडा येथील कपंनीला मान सरकारने इथेनॉलचे दोन परवाने जारी केले आहेत अशी टीका काँग्रेसकडुन करण्यात आली.

Advertisement
Tags :

.