पोकोचा टॅब्लेट होणार लाँच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोको कंपनीने टॅब्लेटच्या क्षेत्रात प्रवेश केलेला असून त्यांचा पहिलावहिला टॅब्लेट भारतात लवकरच लाँच होणार आहे. सदरचा नवा टॅब्लेट भारतात कोणत्या महिन्यात, तारखेला लाँच होणार आहे याची माहिती कंपनीने दिलेली नाही.
पण कंपनीच्या माहितीनुसार कंपनीचा नवा टॅब्लेट फ्लीपकार्टवर लवकरच खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. तसे पाहायला गेल्यास पोकोचा नवा टॅब्लेट जागतिक स्तरावर मे मध्येच पोको एफ 6 सिरीजसोबत लाँच करण्यात आलेला आहे. पण भारतात कधी दाखल करायचा याचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी माहिती आहे.
टॅब्लेटची वैशिष्ट्यो
पोकोच्या नव्या पॅडला बीआयएसचे प्रमाणपत्र भारतासाठी मिळालं आहे. हा नवा पॅड 12.1 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह असून स्नॅपड्रॅगन 7एस जन 2 चिपसेटसह येणार आहे. 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायासह टॅब्लेट असून यात 8 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे.