For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींच्या सभेला 50 हजारांची उपस्थिती असेल

11:38 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींच्या सभेला 50 हजारांची उपस्थिती असेल
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास : तयारीसाठी पणजीत झाली व्यापक बैठक

Advertisement

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मडगावात 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जाहीर सभेला सुमारे 50 हजार लोक हजेरी लावतील, अशी खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त आहे. भाजपचे पदाधिकारी, आमदार यांना दि. 12 व 26 फेब्रुवारी रोजी अयोध्येला नेऊन श्रीराम मंदिर दर्शन घडवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात भाजपची मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मोदी यांची सभा, गाव चलो अभियान व लोकसभा निवडणूक या तीन प्रमुख विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे निवडणूक प्रमुख अशिष सुद, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर प्रमुख नेते, मंत्री, आमदार उपस्थित होते.

सर्वाधिक लोक येण्यासाठी प्रयत्न

Advertisement

बैठकीत डॉ. सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे, श्रीपाद नाईक, सुद यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. मडगावातील मोदींची सभा हा सरकारी कार्यक्रम असून विकसित भारत संकल्प यात्रा 2047 च्या अनुषंगाने मोदी आपले भाषण करणार आहेत. सर्वाधिक लोक मोदींच्या सभेला यावेत म्हणून प्रयत्न  करण्याचे काम सुरू आहे. सभेला 50 हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती अपेक्षित असून 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता मोदींची सभा होणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

लोकसभा निवडणूक तयारीवर चर्चा

या बैठकीत लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यावर चर्चा झाली. निवडणुकीसाठी 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियान सुरू करण्यात येणार असून प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, गावागावात जाऊन विविध योजनांची व भाजपने केलेल्या कामांची माहिती जनतेला देणार आहेत, असेही डॉ. सावंत म्हणाले.

रामलल्ला दर्शनासाठी खास योजना

गोमंतकीय जनतेला अयोध्येतील राममंदिराचे दर्शन घडवण्यासाठी राज्य सरकारतर्फे लवकरच खास योजना आखण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. प्रत्येक भाजप आमदारांकडून मोदींच्या सभेला त्यांच्या मतदारसंघातून किती लोकांना आणणार याची विचारणा बैठकीत करण्यात आली. काही आमदारांनी 500 चा तर काहींनी 800 ते 1000 पर्यंतचा आकडा सांगितला. मडगावातून सर्वाधिक 5000 चा आकडा सांगण्यात आला. ज्यांनी कमी आकडा सांगितला त्यांच्यावर नाखुषी दर्शवण्यात आल्याचे भाजप सूत्रांनी नमूद केले.

लवकरच साकारणार भाजपचे तीन मजली गोवा मुख्यालय : प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली माहिती

गोवा प्रदेश भाजपचे नवे तीन मजली मुख्यालय लवकरच पणजी-फोंडा राष्ट्रीय महामार्गावरील चिंबल परिसरात उभारण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्र्यांना व प्रदेशाध्यक्षांना स्वतंत्र कार्यालय, सहाशे आसन क्षमता असलेले सभागृह, कॅन्टिन आणि रात्री निवासासाठीही खोली असणार आहे. गोवा प्रदेश मुख्यालय बांधकामासाठी मंजुरी मिळाली असून यासंदर्भातील कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाले आहेत. लवकरच बांधकाम हाती घेण्यात येईल. या कार्यालयाचे भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

Advertisement
Tags :

.