बिडेन, पुतीन यांच्याशी पंतप्रधान मोदींचा संपर्क
युक्रेन दौऱ्यानंतर दूरध्वनीवरून चर्चा : युद्ध संपवण्याबाबत सल्लामसलत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया-युव्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान पंतप्रधानांनी पुतीन यांना युव्रेन भेटीची माहिती दिली. रशिया-युव्रेन संघर्षाबाबत त्यांनी आपले मत व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या. तत्पूर्वी सोमवारी रात्री त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा करत युक्रेन दौऱ्याची माहिती देतानाच रशियासोबतच्या युद्धाबाबत सल्लामसलत केली. युव्रेन दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी संपर्क साधत जागतिक पातळीवर आपले स्थान अधिक बळकट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी युव्रेन दौऱ्यानंतर चार दिवसांनंतर संवाद साधला आहे. मोदींनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली. ‘भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि धोरणात्मक भागिदारी मजबूत करण्याबाबत पुतीन यांच्याशी चर्चा केली. तसेच रशिया-युव्रेन युद्धाबाबत त्यांच्याशी विचार शेअर केले.’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. पुतीन यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या युव्रेन भेटीची माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली. युद्धाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनऊच्चार केला. गेल्या दोन महिन्यात पुतीन यांच्यासोबत बोलण्याची ही पंतप्रधान मोदींची दुसरी वेळ आहे. यापूर्वी मोदींनी 8 जुलै रोजी रशियाला भेट दिली होती. त्याप्रसंगीही या मुद्यावर दोघांमध्ये चर्चा झाली होती.
मोदींच्या प्रस्तावाला विशेष महत्त्व
युव्रेन युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींची मौलिक मदत होऊ शकते, असे अमेरिकेला वाटते. दोन देशांमधील संघर्ष रोखण्यासाठी राजनैतिक चर्चा हाच एकमेव मार्ग असून त्याद्वारे दोघांमध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते, असेही पंतप्रधान मोदींनी वारंवार सांगितले आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील पूल म्हणून भारत काम करू शकत असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे पंतप्रधान वारंवार सांगत आहेत. त्यामुळे मोदी-बिडेन यांच्यानंतर मोदी-पुतीन यांच्यातील चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दोन महिन्यात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे दौरे केल्यामुळे जागतिक नेत्यांचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. रशिया-युव्रेन युद्धात भारत सध्या शांतता प्रस्थापित करणाऱ्या भूमिकेत आहे. भारताच्या या पवित्र्यामुळे चीनसह अनेक देशांत सध्या कटुता जाणवत आहे.
जो बिडेन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा
रशिया-युव्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी अलिकडेच झेलेन्स्की यांना शांतीचा संदेश देऊन परतले आहेत. आधी पुतिन आणि नंतर झेलेन्स्की यांची भेट घेऊन पंतप्रधान मोदींनी युव्रेन युद्धात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युव्रेनच्या भूमीवर 7 तास घालवून पंतप्रधान मोदी परतले आहेत. त्यानंतर सोमवारी रात्री पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी संपर्क साधत झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी फोनवर केलेल्या संभाषणात नुकत्याच झालेल्या युव्रेन दौऱ्यासह विविध मुद्यांवर चर्चा केली. बिडेन यांच्याशी झालेल्या फोन कॉलदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत शक्मय तितक्मया लवकर या प्रदेशात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचा पुनऊच्चार केला.
युव्रेन आणि रशियाने युद्ध संपवण्यासाठी एकत्र बसले पाहिजे आणि भारत शांतता पुनर्संचयित करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी जो बिडेन यांना सांगितले. तसेच बांगलादेशच्या मुद्यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांनी सामान्य स्थिती लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याची आणि अल्पसंख्याकांची विशेषत: हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर दिला. ‘आम्ही युव्रेनमधील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर तपशीलवार चर्चा केली’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.