महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी यांच ओमानशी चर्चा

06:43 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे प्रमुख हैथम बिन तारिक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. तारिक हे भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी सकाळी त्यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आले. तारिक यांच्यासह ओमानचे उपप्रमुख आणि त्या देशाचे सात मंत्रीही भारतात आले आहेत. ओमानच्या प्रमुखांचा 26 वर्षांनंतर हा प्रथम भारत दौरा आहे. या दौऱ्यात ओमानशी भारताचा द्विपक्षीय गुंतवणूक करार होण्याची शक्यता आहे. शनिवारच्या चर्चेत द्विपक्षीय संबंधांची समीक्षा करण्यात आली.

Advertisement

आर्थिक गुंतवणूक, व्यापार, संरक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात भारताचे सहकार्य ओमानला हवे आहे. भारतात गुंतवणूक करण्याचीही त्या देशाची इच्छा आहे. याच् वर्षी भारताच्या विदेश विभागाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे ओमानच्या दौऱ्यावर गेले होते. त्याचवेळी ओमानच्या प्रमुखांचा भारत दौरा सुनिश्चित करण्यात आला होता. दोन्ही देशांमध्ये युपीआयचा उपयोग करुन पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी चर्चा केली जात आहे. तंत्रवैज्ञानिक सहकार्यही पेले जाणार आहे.

आर्थिक सहकार्य अधिक बळकट

दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य अधिक बळकट झाले आहे. दोन्ही देशांनी स्थापन केलेल्या संयुक्त निवेष कोषामधील तिसऱ्या योगदानाची घोषणा करण्यात आली आहे. या कोषाच्या माध्यमातून ओमान भारताच्या वेगाने प्रगती करणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहे. भविष्यात ती वाढविण्याचा त्याचा विचार आहे. हा कोष नजीकच्या भविष्यकाळात 30 कोटी डॉलर्सचा होईल असे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article