For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर बदलला डीपी

06:47 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर बदलला डीपी
Advertisement

देशवासीयांना केले खास आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या सोशल मीडिया हँडलवरील स्वत:चे डिस्प्ले पिक्चर (डीपी) बदलला आहे. पंतप्रधान मोदींनी विविध सोशल मीडिया हँडल्सवर स्वत:च्या प्रोफाइल पिक्चरमध्ये राष्ट्रीय ध्वज लावला आहे. पंतप्रधानांनी लोकांनाही याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी त्यांनी देशवासीयांना स्वत:च्या डीपीमध्ये तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

स्वातंत्र्यदिन नजीक आला आहे. आम्ही सर्वांनी मिळून हॅशटॅग हर घर तिरंगला एक स्मरणीय जनआंदोलन करूया. मी स्वत:चे प्रोफाइल पिक्चर बदलत आहे आणि तुम्हा सर्वांनाही माझ्यासोबत मिळून आमच्या तिरंग्याचा जल्लोष करण्याचा आग्रह करत आहे असे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया हँडल एक्सवर नमूद केले आहे.  तसेच त्यांनी देशवासीयांना तिरंग्यासोबतची स्वत:ची सेल्फी ‘हरघरतिंरगा डॉट कॉम’वर शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

यंदा हर घर तिरंगा अभियानाची तिसरी आवृत्ती 9 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत साजरी करण्यात येणार आहे. लोकांनी स्वत:च्या घरांवर तिरंगा फडकवावा असे आवाहन केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले आहे. तर सत्तारुढ भाजपने स्वत:च्या कार्यकर्त्यांना देशभरात तिरंगा रॅली आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. भाजप कार्यकर्ते यादरम्यान अनेक कार्यक्रमही आयोजित करत असतात. तर पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या आंदोलनानेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.