किंम जोंग यांच्या हत्येचा कट
दक्षिण कोरियाला अमेरिकेकडून मदत : दोन्ही देशांच्या सैन्याचे प्रशिक्षण
वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरियाचे सैन्य उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची हत्या घडवून आणण्याची तयारी करत आहे. किम यांच्या संभाव्य हत्येसाठी सक्रीय स्वरुपातसैन्य ‘हत्या अभ्यास’ (डिकॅपिटेशन ड्रिल) करत असल्याचे दक्षिण कोरियाने मान्य केले आहे.
उत्तर कोरियाचा सामना करण्यासाठी हुकुमशहाची हत्या हा एक पर्याय आहे. याकरता आमचे सैन्य सराव करत आहे. ‘हत्या अभ्यासा’त अमेरिकेचे सैन्य आमच्या सैन्याला मदत करत असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.
31 डिसेंबर रोजी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी 2024 साठी नवी योजना जाहीर केली होती. याच्या अंतर्गत उत्तर कोरिया आणखी 3 हेर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. तसेच उत्तर कोरिया नव्या वर्षात अण्वस्त्रांची संख्या वाढविणार आहे. ही माहिती समोर आल्यावर दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांनी हत्येच्या कटासंबंधी माहिती दिली आहे.
हुकुमशहाच्या हत्येविषयी जाहीरपणे बोलणे शक्य नाही, परंतु आमचे सैन्य याकरता प्रशिक्षण घेत आहे. यात हवाई युद्धाभ्यास, प्रमुख सुविधांवर छापे आणि इनडोअर मॉप-अपची तयारी केली जात आहे. अमेरिकेच्या सैन्याचे विशेष दल आणि आमच्या सैन्याने डिसेंबरमध्ये सराव केला होता असे मंत्र्यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाने मार्च 2023 मध्ये पहिल्यांदा स्वत:ची अण्वस्त्रs जगासमोर आणली हीत. उत्तर कोरियाने स्वत:च्या अण्वस्त्रांना हवासैन-31 नाव दिले आहे. उत्तर कोरियाची अण्वस्त्रs आकाराने छोटी असली तरीही त्यांना आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर तैनात करून अमेरिका आणि दक्षिण कोरियात विध्वंस घडवून आणला जाऊ शकतो असे आण्विक तज्ञांचे मानणे आहे.