For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समाजकंटकांकडून कंग्राळी बद्रुकमधील बसथांब्याची दुर्दशा

06:01 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
समाजकंटकांकडून कंग्राळी बद्रुकमधील बसथांब्याची दुर्दशा
Advertisement

गुटखा खाऊन थुंकल्याने भिंती-आसनांची झालेली अवस्था : ग्रा. ंपं.चेही दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या हाकेच्या अंतरावर असलेला स्मार्ट बसथांबा समाजकंटकांकडून स्टार गुटख्याच्या थुंकीने घाणेरडा झाल्यामुळे प्रवासी वर्गाने इकडे पाठ फिरवली आहे. यामुळे सदर बसथांबा प्रवासी वर्गासाठी कुचकामी ठरला आहे. यामुळे शासनाचेही लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. ग्रा. पं. ने बसथांब्याच्या दुर्दशेकडे त्वरित लक्ष देऊन स्टार गुटखा थुंकीने घाण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून बसथांब्याचे पूर्वीचे वैभव प्राप्त करून प्रवासी वर्गासाठी सदर बसथांबा सुखकर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांपासून शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात स्मार्ट बसथांबे उभारुन गावच्या वैभवामध्ये भर घालण्याचे कार्य सुरू केले आहे. बसथांब्यामुळे उन्हात व पावसात ताटकळत थांबणाऱ्या प्रवाशी वर्गाला बसच्या प्रतीक्षेत थांबण्यासाठी चांगली सोय झाली आहे. यातीलच एक भाग म्हणून कंग्राळी बुद्रुक गावामध्येही गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रा. पं. कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर शासनाने लाखो रुपये खर्च करून स्मार्ट बसथांब्याची उभारणी केली. यामुळे गावच्या वैभवामध्ये चांगली भर पडली. परंतु थोड्या दिवसातच सदर बसथांब्यामध्ये समाजकंटकांकडून स्टार गुटखा खाऊन थुंकी तेथेच थुंकत सर्वत्र घाण केली आहे. त्यातच प्रवासी वर्गासाठी बसण्यासाठी असलेल्या खुर्च्यांचीही मोडतोड केलेली आहे. परंतु शासनाने गावातील नागरिकांसाठी बांधून दिलेल्या बसथांब्याच्या देखरेखीकडे पहायला कुणालाच वेळ नाही. यामुळे सदर बसथांबा प्रवासी वर्गाविना कुचकामी ठरला आहे.

ग्रा. पं. कडे देखभालीसाठी वेळ नाही?

सदर स्मार्ट बसथांबा ग्रा. पं. कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सर्व सदस्यांना ग्रा. पं. कार्यालयाकडे जताना सदर बसथांब्याची झालेली दुर्दशा दिसते. परंतु एकासुद्धा सदस्याने बसथांब्याच्या दुर्दशेबद्दल साधा विचार केला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. शासन लाखो रुपये खर्च करून गावच्या विकासामध्ये भर घालण्याचे काम करते. परंतु नंतर त्याची देखभाल करणे, शासकीय मालमत्तेची एखाद्याकडून नुकसान होत असेल तर त्वरित लक्ष देऊन शासकीय मालमतेचे संरक्षण करणे ही सदस्यांची बाब असते. परंतु सदर बसथांब्याची समाजकंटकांकडून एवढी दुर्दशा होऊनसुद्धा सारे डोळे झाकून असल्यामुळे गावचा विकास सुंदर चालला असल्याच्या प्रतिक्रिया जाणकार नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहे.

Advertisement
Tags :

.