महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मान्सूनच्या आगमनाने सुखद धक्का

11:41 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संततधार पावसाने उडविली तारांबळ : पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा

Advertisement

बेळगाव : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेला अखेर गुरुवारी मान्सूनने सुखद धक्का दिला आहे. दुपारी चारनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून दमदार सरी, तसेच पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे गटारी पाण्याने तुडुंब भरून वाहत होत्या. तर  गटारीत कचरा अडकल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे शहरातील जनतेची तारांबळ उडाली होती. गेले आठ दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे साऱ्यांचेच डोळे आकाशाकडे लागले होते. मान्सून यावर्षीही दडी मारणार का, अशी शंका असताना दमदार पाऊस कोसळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. संततधार पावसामुळे शहरातील गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. अनेक ठिकाणी गटारींमध्ये कचरा साचल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत होते. त्यामुळे रस्त्यावरच कचरा पडला होता. मान्सूनच्या दमदार पावसामुळे गुरुवारी शहराच्या विविध चौकांमध्ये पाणी साचून होते.

Advertisement

त्यामधून वाट काढताना कसरत करावी लागत होती. या पावसामुळे फेरीवाले, भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली.संततधार पाऊस पडत असल्यामुळे प्लास्टिक किंवा छत्रीचा आधार घेऊनच व्यवसाय करावा लागत होता. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना छत्री व रेनकोट परिधान करूनच खरेदी करावी लागत होती. सकाळी पाऊस नसल्यामुळे अनेक जण विनारेनकोट आलेल्या वाहनचालकांना भिजतच घर गाठावे लागले. संततधार पावसामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांना तातडीने खरेदी करून माघारी फिरावे लागले. पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. त्यावरून मान्सूनचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे.या पावसामुळे कांदा मार्केट परिसरामध्ये गटारी तुडुंब भरून कचरा रस्त्यावर पसरला होता. यामुळे दुर्गंधीही पसरली. यामधून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती.

याबाबत महानगरपालिकेला अनेकवेळा कळवूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील जनतेतून संताप व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून होते. रस्त्यांवरही पाणी साचले होते. यामुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना ये-जा करणे कसरतीचे झाले होते. आता पावसाला सुरुवात झाल्याने महानगरपालिका शहरातील या समस्या सोडविणार का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. पावसामुळे बाजारपेठेमध्येही दलदल झाली होती. अनेक ठिकाणी साचून असलेला कचरा पावसामुळे इतरत्र वाहून गेला. यावर्षी मान्सूनचे वेळेत आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. अरबी समुद्रासह केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या बातम्या 15 दिवसांपूर्वीच झळकत होत्या. मात्र बेळगावमध्ये आतापर्यंत वळीव पाऊसच झाला होता. पावसाचा थोडाही शिडकावा झाला नाही. त्यामुळे पिके वाळून जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र गुरुवारी पावसाच्या आगमनामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. संततधार पावसाने आता मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article