Satara News : साताऱ्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळ; लालपरी तीनदा 'ब्रेकफेल'
साताऱ्यात सलग तीन दिवसांत एसटी बसचा ब्रेकफेल
by प्रशांत जगताप
सातारा : एसटी नादुरूस्त होणे, ही बाब नित्याचीच, पण एकच गाडी तीन दिवसात सलग तीनवेळा 'ब्रेकफेल' झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या तिन्हीवेळी संबंधित एसटीत प्रवासी होते. ब्रेक निकामी झाल्यानंतर प्रवाशांनी आवेदा गिळला. त्यांच्या काळजाचा ठोकाही चुकला. मात्र, केवळ देव बलवत्तर म्हणूनच ते प्रवासी बचावले.
साताऱ्यातील खंबाटकी घाटात २८ नोव्हेंबर रोजी स्वारगेटहून सातारच्या दिशेने येत असलेल्या एसटी (क्र. एमएच १४ केक्यूं १३९३) चा ब्रेकफेल झाला. त्यावेळी अपघात होता होता वाचला. चालक गोरखनाथ जाधव यांनी प्रसंगावधान दाखवून बसमधील ४५ प्रवाशांचे प्राण वाचवले या घटनेला दोन दिवस उलटले नसताना ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी याच एसटीचा पुन्हा ब्रेकफेल झाला.
१ डिसेंबरला ही एसटी तारळे मार्गावरून धावत होती. त्यावेळी अचानक एसटीचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चढावरून एसटी पाठीमागे सरकू लागली. चालकाने एसटी चांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, ब्रेकच निकामी असल्याने एसटी पाठीमागे सरकत गेली याचवेळी डोंगराच्या कठड्याला धडकल्याने एसटी थांबली. या घटनेवेळी प्रवाशांची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. एसटी थांबल्यानंतर वुद्ध प्रवाशांनी कशीबशी सुटका करून घेतली.
त्यानंतर'हॅटट्रिक' ची बसची. विकेट प्रशासनाची !क्रिकेटपटू सलग तीन बॉलवर तीन विकेट घेतो, तेव्हा त्याला 'हॅटट्रिक' म्हणतात. सातारा आगारातील एमएच १४ केक्यू १३९३ या बसने सलग तीन दिवसांत तीनदा ब्रेकफेल करून 'अजब हॅटिक साथली आहे. मात्र, या सेंट्रिकमुळे एसटी प्रशासनाची निष्क्रियता आणि बेफिकीरीची विकेट मात्र ठळकपणे पडलेली दिसतेय.
दुसऱ्या गाडीतून सर्व प्रवासी मार्गस्थ झाले. संबंधित एसटी नवीन असून चार वर्षापुर्वी ती आगारात दाखल झाल्याची चर्चा आहे. तसेच बिघाड झाल्यानंतर वेळोवेळी तीची दुरूस्तीही करण्यात आली होती. मात्र, सलग तीनवेळा गाडीचा ब्रेकफेल झाल्याने शंका उपस्थित होत आहे.
चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या अधिकाऱ्यांर्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी केली आहे.