१५० वर्षेपर्यंत जगण्याचे प्लांनिंग
स्वत:चे जैविक वय 10 वर्षांनी घटविल्याचा दावा
लॉस एंजिलिसची 34 वर्षीय कायला बार्न्स-लेंट्जने सरासरी जीवनाच्या मर्यादा तोडण्याचे आणि 150 वर्षांपर्यंत जगण्याचे स्वप्न पाहिले आहे. स्वत:ची शिस्त आणि लाइफ एक्सटेंशन उपायांद्वारे स्वत:चे जैविक वय 10 वर्षांनी कमी केल्याचा दावा तिने केला आहे. प्रारंभी माझा परिवार आणि मित्रांना हा प्रकार विचित्र वाटला. माझ्या आईने पहिल्यांदा मला सीजीएम (ब्लड ग्लूकोज मॉनिटर) करताना पाहिले तेव्हा ती त्रस्त झाली. मी अनेक वर्षांपासून परिवारासोबत बसून भोजन केलेले नाही. कारण मी स्वत:च्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करते. मी बाहेर खाणे आणि मित्रांसोबत पार्टी करण्याऐवजी त्यांना घरी सकस डिनरसाठी बोलावते असे कायला सांगते.
दर महिन्याला बायोमेकर्स तपासणी
जीवनाला 150 वर्षांपर्यंत वाढविण्यासाठी मी सर्वप्रथम डाटा आणि डायग्नोटिक्सवर लक्ष देते. दर तिमाहीत शेकडो बायोमेकर्सची तपासणी करविते, ज्यात शरीरातील प्रत्येक अवयवाची स्थिती, पोषण स्तर, आतड्यांचे आरोग्य, मायक्रोप्लास्टिक्स सारख्या विषारी घटकांचा स्तर सामील आहे. माझ्या चिकित्सा प्रक्रियांमध्ये ईबीओओ, प्लास्माफोरेसिस, पेप्टाइड थेरपी, स्टेम सेल ट्रीटमेंट, आयव्ही थेरपी, ओजोन सॉना आणि रापामाइसिन औषध यासारखे उपाय सामील असल्याचे कायला हिने सांगितले आहे.
सकस आहार, नियमित व्यायाम
कायला आठवड्यात 250 मिनिटे मध्यम-तीव्रता आण 80 मिनिटे उच्च तीव्रतेचा कार्डियो करते. तिचा आहार मुख्यत्वे मेडिटेरियन, जैविक खाद्यपदार्थांवर आधारित आहे. ज्यात रोपे, उच्च गुणवत्तायुक्त प्रोटीन सामील आहे. कायला कधीकधी रेड मीटचे सेवन करते. तिचे भोजन सूर्यास्तानंतर समाप्त होते. ती रात्री 8.30 वाजेपर्यंत झोपी जाते. तिच्या झोपेच्या गुणवत्तेला एक ऑरा रिंगने टॅक केले जाते.