महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पती-पत्नीच्या भांडणामुळे विमानाचे दिल्लीत लँडिंग

06:16 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्युनिक-बँकॉक प्रवासातील घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

म्युनिक आणि बँकॉक दरम्यान उड्डाण करणाऱ्या लुफ्थान्सा एअरलाईन्सच्या विमानात बसलेल्या एका जोडप्यामध्ये झालेल्या जोरदार भांडणामुळे विमान बुधवारी दिल्लीत उतरवावे लागले. बँकॉकहून जर्मनीतील म्युनिक येथे जाणाऱ्या लुफ्थान्सा एअरलाईन्सच्या विमानाचे बुधवार, 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:26 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात उपस्थित असलेल्या जोडप्याच्या भांडणामुळे ते विमान दिल्लीकडे वळवण्यात आले होते. मात्र, पती-पत्नीमध्ये भांडण का झाले याची माहिती समोर आलेली नाही, असे दिल्ली विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

पती-पत्नीमध्ये झालेल्या जोरदार भांडणानंतर फ्लाईट क्रूने प्रथम पाकिस्तानमध्ये उतरण्याची परवानगी मागितली. परंतु पाकिस्तान प्राधिकरणाने नकार दिल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्या आले. सुऊवातीला पती-पत्नीमध्ये वाद झाला, ज्याचे हळूहळू मारामारीत रुपांतर झाले. यानंतर क्रू मेंबर्सनी विमान वळवण्याचा निर्णय घेतला, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

पत्नीने केली पतीची तक्रार

जर्मनीतील एका 53 वषीय व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. त्याची पत्नी थायलंडची आहे. महिलेने आपल्या पतीच्या वाईट वागणुकीची तक्रार विमानाच्या पायलटकडे करत हस्तक्षेपाची मागणी केली. नवरा आपल्याला धमकावत असल्याचे तिने सांगितले. तिने फ्लाईटमध्ये अन्न फेकणे, लायटरने बेडशीट जाळण्याचा प्रयत्न करणे आणि पत्नीवर ओरडल्याचा आरोप पतीवर केला आहे. यानंतर त्याने विमान कर्मचाऱ्याचेही ऐकण्यास नकार दिला. त्यानंतर फ्लाईटमध्ये भांडणाऱ्या व्यक्तीला दिल्ली विमानतळावर उतरवून सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले. यासंबंधी लुफ्थान्सा एअरलाईन्स जर्मन दुतावासाच्या संपर्कात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article